असदोद्दीन ओवेसींनी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला सुनावले खडे बोल
Asaduddin Owaisi gave harsh words to Pakistan's Shahid Afridi

लोक जात धर्म विचारून मारहाण करतात त्याची आम्ही निंदा करतोय, असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले. अशातच आता भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला खडेबोल सुनावले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेसोबत आहेत, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला टीकास्त्र सोडलंय. जे लोक जात धर्म विचारून मारहाण करतात त्याची आम्ही निंदा करतोय,
असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले. अशातच आता भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याला देखील ओवैसी यांनी खडेबोल सुनावले.
भारत स्वत:च्याच लोकांना मारत आहे आणि पाकिस्तानवर आरोप केला जातोय, असं वादग्रस्त वक्तव्य शाहिद आफ्रिदीने म्हटलं होतं. त्यावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी एका वाक्यात आफ्रिदीला क्लिन बोल्ड केलंय.
पत्रकारांनी असदुद्दीन ओवैसी यांना शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला, तेव्हा ओवैसी यांनी एका वाक्यात विषय संपवला. ‘कोण आहे हा शाहिद आफ्रिदी… का त्या जोकराचे नाव घेत आहात’, असं म्हणत एका वाक्यात असदुद्दीन ओवैसीने शाहिद आफ्रिदीला क्लिन बोल्ड केलं.
दरम्यान, युद्ध हे सरकारवर सोडा.. सरकार काय करणार हे सरकार ठरवणार आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही सरकारला सांगितलं आहे. तुम्हाला काय करायचं करा,
पण हा दहशतवाद कायमच संपवा. सरकारला त्यांचे काम करू द्या. सेल्फ डिफेन्समध्ये हल्ला करण्याचा भारताला अधिकारी आहे. – इलिगल पैशातून अतिरेक्यांना मदत मिळत आहे.
सरकारने यावर ॲक्शन घ्यायला हवी. काश्मिरी आदिलने हिंदू- मुस्लिम पहिलं नाही. जर कोणी हिंदू मुस्लिम करीत असेल तर ते चुकीच आहे. त्याची निंदा करतो, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचा राजदूत म्हणून मी म्हणेन की स्पोर्टस डिप्लोमसीवर माझी भूमिका खूप स्पष्ट आहे. यावर कोणतेही राजकारण होऊ नये. आपण शेजारी देश आहोत, आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.
पण गोष्ट अशी आहे की हा प्रसंग नुकताच घडला आहे आणि तुम्ही थेट पाकिस्तानचे नाव घेतले. निदान तुम्ही पुरावे घेऊन यावं आणि जगाला सांगावे. कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही.
तिथं जे घडलं ते दुःखद आहे. पाकिस्तानमध्ये जे घडत आहे ते देखील खेदजनक आहे. अशा गोष्टी घडू नयेत. मला वाटतं की आपले एकमेकांशी चांगले संबंध असले पाहिजेत. लढाईचा कोणताही उपयोग होणार नाही, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला होता.