आमेर खान पोहचला सुप्रीम कोर्टात CJI चंद्रचूड म्हणाले ‘कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही
Aamir Khan reached the Supreme Court CJI Chandrachud said 'I don't want a stampede in the court but Aamir Khan is here too.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध असलेल्या तीन खानपैकी एक असलेला आमीर खान शुक्रवारी सायंकाळी अचानक सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला.
आमीर खान निर्माता असलेल्या ‘लापता लेडीज’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आमीर सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. या विशेष स्क्रीनिंगसाठी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्याबरोबर
इतर अनेक न्यायाधीश, त्यांचे कुटुंबीय, सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी वर्ग, रजिस्टार उपस्थित होते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वत: आमीरचं स्वागत केलं, असं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ‘लापता लेडीज’ हा चित्रपट सर्व कर्मचाऱ्यांना दाखवला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमांअंतर्गत ‘लापता लेडीज’ चित्रपट कोर्टात दाखवला जाणार असून स्पेशल स्क्रीनिंग केलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं.
याच पत्रकामध्ये सदर स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव आणि निर्मात्यांपैकी एक असलेले प्रसिद्ध अभिनेते आमीर खानही आपल्यासोबत उपस्थित असतील, असं सांगण्यात आलं होतं.
नियोजित स्क्रीनिंगसाठी आमीर खान सुप्रीम कोर्टात पोहोचल्याची दृष्यही शुक्रवारी व्हायरल झाली. दरम्यान, आमीर आणि त्याची पूर्वाश्रमाची पत्नी किरण राव कोर्टात
या स्क्रीनिंगसाठी हजर असल्याची घोषणा करताना सरन्यायाधीशांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळेस सरन्यायाधीशांनी आमीरची लोकप्रियता अधोरेखित करण्यासाठी खास शैलीमध्ये एक विधान केलं.
“कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही उपस्थित आहे. तो या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हजर राहिला आहे.
दिर्गदर्शिका किरण रावही आपल्यासोबत उपस्थित आहेत,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटल्याचं वृत्तात नमूद केलं आहे.
‘लापता लेडीज’ही दोन आदलाबदली झालेल्या ग्रामीण भागातील नवविवाहीत तरुणींबद्दल आहे. ट्रेनच्या प्रवासामध्ये या दोघी चुकीच्या घरी सून म्हणून जातात
आणि त्यानंतर काय होतं हे चित्रपटामध्ये अगदीच रंजक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती किरण राव यांच्या किंडलींग प्रोडक्शन
आणि आणिर खानच्या आमीर खान प्रोडक्शनने केलेली आहे. हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वाचार ते 6.20 दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये दाखवण्यात आला. आमीर मात्र अडीच वाजताच कोर्टात या स्क्रीनिंगसाठी दाखल झाला होता.