उमेदवाराचा केला गेम ! काँग्रेसने तिकीट दिलं; पण एबी फॉर्मच पाठवला नाही

The candidate's game! Congress gave ticket; But the AB form itself was not sent

 

 

 

महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी एकाच जागेवर दोन उमेदवार देण्याचे प्रकार घडले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सोलापूर दक्षिणच्या जागेवरूनही महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला होता,

 

पण याच जागेवरून आता नवी ट्वीस्ट आला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली,

 

यानंतर दिलीप माने जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले, पण त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मच देण्यात आला नाही.

 

एबी फॉर्म न मिळाल्याने दिलीप माने हे तहसील कार्यालयात थांबून होते, पण फॉर्म पोहोचला नसल्यामुळे दिलीप माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

 

दिलीप माने यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आता महाविकास आघाडीकडून अमर पाटील हे अधिकृत उमेदवार असणार आहेत.

 

शिवसेना ठाकरे पक्षाने या मतदारसंघातून अमर पाटील यांना तिकीट दिलं, त्यानंतर दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्लीहून फोन केला

 

आणि दिलीप माने यांना उमेदवारी मिळेल, असं आश्वासन प्रणिती शिंदे यांनी केलं होतं. यानंतर काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्येही दिलीप माने यांचं नाव होतं, पण अर्ज भरताना दिलीप माने यांना एबी फॉर्मच देण्यात आला नाही

 

दरम्यान एबी फॉर्म मिळाला नसल्यामुळे दिलीप माने यांनी काँग्रेसवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. तसंच दिलीप माने यांनी संजय राऊतांवरही टीका केली आहे.

 

तसंच दिलीप माने यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी विश्वासघात केल्याची टीका दिलीप माने यांच्या समर्थकांकडून केली गेली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *