गटविकास अधिकाऱ्याला वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक
Group development officer arrested for accepting bribe of Rs

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने येवला पंचायत गटविकास शहरातील समितीचे अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांतर्गत 2022-2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर
ठेकेदारामार्फत झालेले विकासकामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के या प्रमाणे 20 हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारली असता
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिला घारगे वालावलकर,
अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निलिमा केशव डोळस पोलीस निरीक्षक यांच्या
मार्गदर्शनाखाली पो. ह. गांगुर्डे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदीच्या पथकाने कारवाई करण्यात आली आहे.









