पंकजा मुंडे नवीन पक्ष काढणार?
Will Pankaja Munde form a new party?

“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मुंडे यांची कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.
त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती.
“पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील”,असे ते म्हणाले होते. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली.
“स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट सांगू शकतो. 2002 ची गोष्ट असेल,मी उपमुख्यमंत्री होतो.
गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू असं म्हणाले.
पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो म्हटलं मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही सांगितलं.
मी सांगितलं माझी काही हरकत नाही, इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल तर हरकत नाही असंही म्हटलं. पण नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला, अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली.
“स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकतं. पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं,
हे कितपत यशदायी आहे, याची मला कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असो”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“आपल्यापुढे अशी कित्येक उदाहरणं आहेत. काही समाजाने, घटकाने वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले,
त्यांना कितपत यश मिळालं, याचा लेखाजोगा त्यांनी घ्यावा असा इशारा भुजबळांनी दिला. पण त्यांनी ( पंकजा मुंडे) त्याचा अभ्यास केला असेल.
मात्र त्यांनी असं म्हटलं म्हणून त्या काही पक्ष काढतील, असं काही मला वाटत नाही. स्व. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढाच अर्थ त्याचा आहे”, असं मला वाटतं, असं भुजबळांनी नमूद केलं.
नाशिक येथे आयोजित वारकरी भवनातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असे म्हटले होते.
मात्र त्यांचे हेच वक्तव्य भाजपला सूचक इशारा दिला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यावर आधी संजय राऊत आणि आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे
दरम्यान विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
“नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो.
तेव्हा ते म्हणाले ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेलं तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले. त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हटलं की,
हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजपा) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. आता आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. “तसेच गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक गोपीनाथ मुंडे
यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून पक्ष उभा केला”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
“कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतं. आता पंकजा मुंडे म्हणतात त्या प्रमाणे मोठा पक्ष असेल. मात्र, माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यावर यश मिळवणं हे कितपत यशदायी असेल याची मला कल्पना नाही. मग कोणताही समाज असो आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत.
वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढलेत. मग ते किती चालले किती नाही याचा लेखाजोखा त्यांनी घेतला पाहिजे. याचा अभ्यास त्यांनी केला असेल. पंकजा मुंडे यांनी म्हटलं असलं तरी त्या लगेच पक्ष काढतील असं मला तरी काय वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊ या की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.