पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ

Substantial increase in the salary of police officers

 

 

 

 

 

राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

 

आतापर्यंत पोलिस पाटलांना 6 हजार 500 रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन 15 हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे.

 

 

 

 

गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता. राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत  सरकारी पातळीवर निर्णय झाल्याने आता आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

अलीकडेच गोंदिया येथे पोलिस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटलांचा सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी पोलिस पाटलांना मानधान वाढीबाबतचे वचन दिले होते.

 

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस पाटलांचे मानधन 6 हजार 500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली.

 

 

 

 

त्यानुसार बुधवार, (ता. 13) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस पाटलांच्या बैठकीत मानधनात 8 हजार 500 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलिस पाटलांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

 

 

 

 

2019 पूर्वी पोलिस पाटलांच्या मानधन केवळ 3 हजार रुपये होते. 2019 मध्ये पोलिस पाटील संघटनेने  मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.

 

 

 

पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी फडणवीस सरकारने पोलिस पाटलांचे मानधन 3 हजार रुपयांवरून 6 हजार 500 रुपये केले होते.

 

 

 

आता पुन्हा एकदा फुके यांच्यामुळे पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाली आहे. पोलिस पाटलांच्या मानधनात पुन्हा दुपटीने वाढ  करण्यात आलुयाने  राज्यभरातील पोलिस पाटलांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *