प्रेम सेम असतं का ?

Is love real?

 

 

 

 

लहानपणापासून वाचत आलेल्या या दोन ओळी आयुष्याच्या अर्ध्यापर्यंत समजलेल्या नाहीत.

 

आजही नाती ही जगाला दाखवणाऱ्या किंवा जगाला दाखवणाऱ्या  किंवा समजणाऱ्या रीती रिवाजानुसार आपण मानतो .

 

प्रत्यक्षात माझा जोडीदार माझा तर आहे पण माझी वैयक्तिक प्रतिमा किती म्हणून जपणारा आहे.

 

एखादा प्रश्न प्रमाण म्हणून करणे आणि आपल्या जोडीदाराच्या भावना समजून करण यात आजही धरती आणि आकाशा  एवढा अंतर आहे.

 

गंमत तर ही आहे की, हे अंतर आजही तेवढेच आहे . दररोज एक उगाच हट्ट करतो ,मन की,

 

आज त्याने काहीतरी असं करावं ,जेणेकरून माझ्या मनाला वाटेल की अंतर कमी झालं.  पण मागच्या पंधरा वर्षात असा एकदाही नाही झालं.!

 

हे कसलं प्रेम !! ज्यात अजूनही काही सेम झालं नाही.  फरक फक्त एवढाच की तो माझा म्हणायला आणि या जगात दिसायला.

 

प्रेम करणं कोणाच्याही  वैयक्तिक इच्छेत राहत नाही. ते होतं ,आणि बस्स होतच राहत .

 

त्याच्यासारखे मी झाले हेच माझ्या  प्रेमाचे सार्थक . जर तो  हे समजत नसेल तर या जगातला निर्बुद्धी प्राणी .

अशाच एखाद्या दिवशी मी पण नसेन , मग बरं त्याच्या प्रेमाचा उत्सव सुरू असेल . पण त्यात भिजण्यास  मी नसेल.

 

अगदी अंतकरणाच्या उराशी लागेल तरी   मी नसेल.  विचित्र वाटत असेल पण जरा थांबून आजचं पाहून घ्या,

 

आपल्यासाठी प्रेम करणाऱ्याला भेटून घ्या, व्यक्त करा ,आणि प्रेमाचा उत्सव सुरू करा ! मग पाहा जोडीदारासमवेत  किती आनंद,

 

त्याच्या एका हसूवर आपले कोटी हसू ,मग भिजतालच ना उत्सवात आनंदाच्या.  मग तुम्हीही म्हणाल की, ” प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *