बीड हत्याकांड ;अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण, आता सुरेश धस यांचा मोर्चा धनंजय मुंडेंकडे

Finally Valmik surrenders to Karad CID, now Suresh Dhas's front is towards Dhananjay Munde

 

 

 

पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड आज सीआयडीसमोर शरण आला. वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे.

 

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आला. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळे दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराडला शरण यावं लागलेलं आहे.

 

प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा इतक्या कणखर निर्णय आणि धडाथड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असं सुरेश धस यांनी सांगितले.

 

पोलिसांनी वाल्मिक कराड शरण येण्यास भाग पाडले. वाल्मिक कराड यांची संपंत्ती जप्त झाली पाहिजे. तोपर्यंत आका जे गुन्हे करत होते..ते उघडे पडणार नाही.

 

सुदर्शन घुले जो प्रमुख आरोपी आहे. ज्याने देशमुख यांना गाडीत खेचून हल्ला केला. राजकारण्यांनी सांगितलं होतं का संतोष देशमुख यांना मारा म्हणून…

 

2023 मध्ये माझ्या मतदारसंघात ओटू कंपनीच्या अधिकाऱ्यांना असच उचललं होतं. मी परळी पॅटन आणू नका, असं त्यांना बोललो होतो, असं सुरेश धस म्हणाले.

 

राजकीय हेतूने आरोप हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले…कशाचा राजकारण आणि कशाचा काय…आम्ही कोणी राजकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का?

 

इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्यानंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत असं माझं मत आहे.

 

तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता. अशीच एक घटना ऑक्टोबर 2023 ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती.

 

ओटू कंपनी होती त्या कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते. उचलून चालल्याच्यानंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आणू नका असे मी स्वतः बोललो होतो.

 

 

आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांचे हिम्मत झाली. त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोचलेले होते. राहिलेल्या दीड कोटी साठीच हे माणसं कोणी पाठवले होते हे आकांनीच पाठवले होते.

 

त्याच्यामुळे आता ऑटोमॅटिकली मला वाटतं ते या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही, असं सुरेश धस यांनी सांगितले.

 

वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सिझ करण्यासंदर्भात आता कोर्टाकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. यांच्या प्रॉपर्टीज झाल्याच पाहिजेत. अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग सुद्धा अवलंब लागेल, असं सुरेश धस म्हणाले.

विशेष बाब म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावं. याआधी नक्षली जिल्हा म्हणून त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्विकारलं आहे.

 

त्यामुळे आता आव्हानात्मक जिल्हा म्हणून बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. आकाच्या आकांवर मी बोललो नाही.

 

त्यांच्या पक्षाचे लोक बोललेल आहेत. आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा, असं त्यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके बोलले आहेत, असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *