भाजप महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी

BJP woman MLA receives death threat

 

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता आणखी एका महिला आमदाराला जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. आमदार श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी धमकीच पत्र पाठवण्यात आलं होतं.

 

आज (शुक्रवारी) दुपारी आमदार श्वेता महाले यांनी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आलेल्या पत्रामध्ये आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे.

 

नेमकी किती पत्र आहेत आणि त्यामध्ये काय लिहलंय ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मिळालेल्या पत्रामध्ये तुला जिवे मारून टाकू,

 

तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती, असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितलं आहे.

 

याप्रकरणी माध्यमांना माहिती देताना श्वेता महाले म्हणाल्या, काल माझ्या कार्यालयामध्ये मी निनावी पत्र आलं. एका लिफाफ्यामध्ये तीन धमक्या देणारी पत्र होती. त्या पत्रामध्ये जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आलेला होता.

 

एका विशिष्ट समाजाचा उल्लेख देखील त्या पत्रामध्ये केला आहे आणि त्या समाजाकडून मला मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘सिर तन से जुदा’, अशा टाईपची लाईन तिन्ही पत्रामध्ये लिहिण्यात आलेली होती.

 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्यासोबत असलेली सुरक्षा त्यांना वाचू शकली नाही, त्या तुलनेत तर आमदाराला काहीच सुरक्षा नसते. ती सुरक्षा जरी असली, तरीही जिवंत मारू. धड शरीरापासून वेगळा करू. आम्ही बकरे कापणारे आहोत.

 

अशा पद्धतीची ती तीन पत्र मला काल मिळालेली आहेत, आता या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे, पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती श्वेता महाले यांनी दिली आहे

 

एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघां आरोपींना देखील बुलढाण्यातूनच ताब्यात घेतलं आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे.

 

 

मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे.

 

हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *