भाजपचे आमदार तरुणांना म्हणाले ,शिकण्यापेक्षा पंक्चर काढण्याचे दुकान सुरू करा
BJP MLA said to the youth, start a puncture removal shop instead of studying

शिकून पदवी मिळविण्यापेक्षा दुचाकी पंक्चर काढण्याचे दुकान सुरू करा, यातून किमान जगण्यासाठी लागणारा पैसा तुम्हाला कमावता येईल,
असा सल्ला मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी विद्यार्थ्यांना दिला. शाक्य हे गुना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
आपल्या कार्यक्षेत्रात ‘पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्स’ या उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ५५ जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्स’ उपक्रमास रविवारी सुरुवात केली. हा उपक्रम इंदूरसोबत गुना येथेही सुरू झाला आहे.
‘महाविद्यालयांकडून पदव्या मिळवून काहीही होणार नाही. त्यापेक्षा दुचाकी पंक्चरचे दुकान सुरू करा, हे माझे ‘बोधवाक्य’ तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावे’, असे त्यांनी ‘पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्स’ या उपक्रमाचे उद्घाटन करताना सांगितले.
यावेळी त्यांनी जनतेलाही कानपिचक्या दिल्या. ‘लोक वृक्षारोपण करतात; मात्र रोपांना पाणी देत नाहीत. मानवी शरीर निर्मितीत योगदान असलेली पंचमहाभूत तत्त्वांचे रक्षण प्रत्येकाने केले पाहिजे.
प्रदूषण आणि पर्यावरणाबाबत गप्पा तर होतात. प्रत्यक्षात काम केले जात नाही. रोपण केल्या जाणाऱ्या झाडांना वाढविण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत, असे ते म्हणाले. तसेच,‘लोक दुष्परिणामांची चिंता न करता काहीही खातात’, असेही त्यांनी नमूद केले.
देशात शिक्षित बेरोजगारांची संख्येत वाढ झाली आहे त्यात सरकार अनेक योजना तसेच उपक्रम राबवत आहे. पण अशातच
भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांचे ‘पंतप्रधान कॉलेज ऑफ एक्सलन्स’ या उपक्रमाच्या उद्घाटनावेळीस असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे तरुण, विद्यार्थी तसेच विरोधकांच्या टीकेला त्यांना सामोर जावे लागणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता, शाक्य यांना भाजपने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत गुणा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.
त्यांनी पक्षाला ‘बिकाऊ (विकलेल्या) नेत्यांना तिकीट देऊ नका’ त्याऐवजी ‘ टिकाऊ (निष्ठावान)’ नेता निवडण्याचे आवाहन केले होते
त्यानंतर त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली. पन्नालाल शाक्य यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर गुणाची जागा जिंकली होती, परंतु २०१८ मध्ये ते काँग्रेसकडून पराभूत झाले होते.