मराठवाड्यातील माजी आयुक्त मधुकर आर्दड विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

Former Commissioner of Marathwada Madhukar Ardad in the assembly election arena

 

 

 

मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आज जाहीर केलंय.

 

मनोज जरांगेंच्या कुणबीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा असल्याचं सांगत त्यांनी मतदारसंघाची जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं  सांगितलं.

 

 

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्नही तापत आहे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्याची मागणीला पाठींबा देत

 

मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे विधानसभा लढवणार आहेत. मुख्यमंत्री किंवा अजित दादांना तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील. त्यांचं माझ्याबाबतीत मत चांगलं आहे, असंही अर्दड म्हणाले.

 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दर्शवला.

 

तसेच मुख्यमंत्री किंवा अजित दादांना तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील. त्यांचं माझ्याविषयीचं मत चांगलं असल्याचं सांगत मुख्यमंत्रीही मला चांगली वागणूक देत असल्याचं सांगितलं.

 

घनसावंगीतून जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांसह मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण देण्याची मागणी केलीय. या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अर्दड म्हणाले.

 

सध्या विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेत असल्याचे दिसून येत असताना

 

माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनीदेखील त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर महिनाभराने त्यांनी विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केलं आहे.

 

जालना विधानसभेच्या जागेवरून खोतकरआणि दानवे पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती

 

आता भाजपकडून दावा केला जातोय. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालन्याची जागा भाजपला सुटावी,

 

अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यास म्हटलंय. शिवाय उमेदवारी दिलीच तर कोणी नाही म्हणणार? असं म्हणत जालन्याच्या जागेवरती

 

त्यांनीही आता शड्डू ठोकला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *