महायुती सरकारमधील मंत्र्याने राष्ट्रपतींची जमीन लाटली, संजय राऊतांचा गंभीर आरोप
A minister in the grand alliance government looted the President's land, Sanjay Raut makes a serious allegation

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नुकताच संजय राऊत हे दिसले आहेत. राऊत म्हणाले की, शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे आहेत आणि हे आपण पाळले पाहिजे.
त्यांनी दिलेला विचार जो आहे तो अन्यायाविरोध लढण्याचा आहे. राज्यात शिवरायांमुळे इतिहास आहे. गद्दारी आणि बेईनामीविरोधात हल्लाबोल करण्याची वेळ आलीये.
कल्याण येथील शिवाजी महाराज यांच्या देखाव्याबद्दल बोलतानाही संजय राऊत हे दिसले. एखाद्या कार्यक्रमातून कोणी टीका केली असेल तर ते दिखावे उद्धवस्त करण्याचे कारण पोलिसांना नाहीये.
पुढे राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशी अनेक पात्र आहेत की, त्यांची आता चेहरे पुढे येत आहेत. मी देवेंद्र फडणवीस यांना विचारणार आहे की,
तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना लुटण्याचा परवाना दिला आहे का? नाव लक्षात ठेवा जयकुमार रावल. अत्यंत भ्रष्टकारभार करणारे हे मंत्री आहेत.
प्रतिभाताई पाटील यांची जमीन यांनी लाटली. चक्क राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत यांची हिंम्मत गेली. हायकोर्टाने आता त्यावर ताशेरे मारले आहेत.
जयकुमार रावलने कोट्यावधीचा घोटाळा केला, असे लोक मंत्रिमंडळात आहेत. असे एक नाव नाही तर असे किमान सात ते आठ नावे या सरकारमध्ये आहेत.
त्यांनी या महाराष्ट्राचे वातावरण खराब केलंय, अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक कागदपत्रे पुरवत आहेत,
आम्ही आभारी आहोत. भारतीय जनता पक्षाच्या लोकांची कट कारस्थान करण्याची निती आहे. कपट आणि कारस्थान गेल्या दहा वर्षात राजकारणात कोणी आणले असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी.
आपल्या विरोधकांना तुरूंगात टाकणे, विरोधकांच्या कुटुंबियांचा झळ, हल्ले करणे हल्ले घडवणे, बदनामी करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. बजरंग दल,
विश्वहिंदू परिषद हे आरएसएसचीच पिल्लं आहेत ना…मग हे सर्व वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंम्मत आहे काढण्याची.
या क्षणी आैरंगजेबाच्या कबरी शेजारी केंद्र सरकारचे पोलिस दल आहे. मग ते का ठेवले संरक्षणासाठी? मग ही नाटके कशासाठी करता असा प्रश्नची राऊतांनी उपस्थित केला.