महायुतीत या’ चार जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली

These four seats in the Grand Alliance increased BJP's headache

 

 

 

 

 

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचं घोडं अजूनही अडलं आहे.

 

 

 

जी अवस्था सत्ताधारी महायुतीच झाली आहे तीच अवस्था महाविकास आघाडीमधील नेत्यांची झाली आहे. नाराजांना थंड करताना आणि त्यांची समजूत घालताना आपण दोन्हीकडील नेते हैराण होऊन गेले आहेत.

 

 

 

 

या सर्व पार्श्वभूमीवर आता गल्लीतील भांडण मिटवताना मुंबईमध्ये घामटा फुटत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये घामटा फुटत असल्यने हे सर्व फैसले आता दिल्लीच्या वर्तुळात गेल्याची चर्चा आहे.

 

 

 

मातब्बर नेत्यांना सुद्धा उमेदवारीबद्दल कोणतेच संकेत मिळत नसल्याने एकंदरीत महायुतीमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपची पहिली यादी आल्यानंतर माढामध्ये वाद टोकाला गेला आहे.

 

 

या ठिकाणी भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरी त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.

 

 

 

त्याठिकाणी थेट उमेदवार बदलावा अशी मागणी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये आव्हान निर्माण झालं आहे.

 

 

 

याठिकाणी विजय शिवतारे यांना समजावून देखील त्यांनी बंडाचे निशाण कायम ठेवलं आहे. त्यामुळे एकंदरीत सुनेत्रा पवारांविरोधात विरोध वाढत चालला आहे. हर्षवर्धन पाटील सुद्धा अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

 

 

 

दुसरीकडे, अमरावतीच्या जागेवरून सुद्धा भाजपमध्ये डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभेला नवनीत राणा यांच्या उमेदवारीचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर

 

 

 

आता त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक भाजप नेते विरोधात गेले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना कमळाच्या चिन्हावरून अमरावतीमध्ये उतरवण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा असला तरी स्थानिक पातळीवर कडाडून विरोध होत आहे.

 

 

 

सोलापूरमध्येही सुद्धा आपण भाजपसाठी उमेदवारी ठरवताना आव्हान निर्माण झाला आहे. भाजपकडून सोलापूरचा उमेदवार

 

 

 

बदलला जाणार हे निश्चित आहे. मात्र, उमेदवार ठरवण्यामध्ये स्थानिक नेत्यांमध्ये मतमतांतरे असल्याने हा सुद्धा तिढा सुटलेला नाही.

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सातारमध्ये उमेदवार कोण असणार आणि जागा कोणाला सुटणार यावरती सुद्धा खल सुरू आहे. या ठिकाणी अजित पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे.

 

 

शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारीचा घोळ अजून संपलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये तळ ठोकला आहे.

 

 

 

मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी अजूनही झालेला नाही. आज (23 मार्च) त्यांची भेट होते का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या सर्व जागांवरून भाजपची अडचणी वाढली आहे.

 

 

 

 

महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाची असली तरी त्या ठिकाणी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे.

 

 

 

ही स्थिती रामटेक कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेला नारायण राणे

 

 

यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.

 

 

 

दुसरीकडे अजित पवार गटाकडून धाराशिव, गडचिरोली, सातारा या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे, त्यामुळे सुद्धा अडचणीत वाढ पडली आहे यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा भावना गवळी यांना विरोध होत आहे.

 

 

 

त्यामुळे भाजपचे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर लावून बसले आहेत. रामटेकची जागा आपल्याच ताब्यात घ्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *