युद्धविराम;मोदी ,ट्रम्पसमोर का झुकले , संजय राऊतांच्या विधानाने खळबळ
Ceasefire; Why did Modi bow down before Trump, Sanjay Raut's statement creates a stir

ट्रम्प असो किंवा पुतीन यांना लक्ष घालण्याची गरज नाही. सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या गावचे पाटील.
पण मोदी सरकाने जी बोटचेपी भूमिका घेतली आहे त्यामुळे ट्रम्प भारतामध्ये घुसले आहेत. हे देशाच्या सार्वभौमत्वाचं दुर्देव्य आहे.
हा सौदा काय झालाय हे भविष्यामध्ये समजेल, कोणावरचे खटले काढून घेतले जातायेत किंवा अजून कोणाला काही कळतंय, काही काम उद्योगपतींना मिळतंय.
काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटतेय या गोष्टी हळूहळू उघड होतील. भारत आणि अमेरिकेमध्ये सौदा काय झाला हे भारताला समजणं गरजेचं आहे.
भारताच्या आंतरबाबीमध्ये ट्रम्प यांनी नाक खुपसणं म्हणजे हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्त्वाचा अपमान आहे.
मिस्टर मोदी संसदेचे अधिवेशन घ्यायला तयार नाहीत पण देशातील प्रत्येक घडामोडींची माहिती ट्रम्प यांना दिली जाते आणि त्यांच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशात अंतर्गत झालेल्या हल्ल्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. युद्धात सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम कोणी केलं असेल आणि ट्रम्पला घुसवलं त्याला जबाबदार परराष्ट्र धोरण आणि प्रधानमंत्री कार्यालय आहे.
तुम्ही लाहोर आणि कराचीवरती तिरंगा फडकावण्याची घोषणा केली होती. तिथे आमच्याविरूद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत,
हे भारतीय म्हणून दु:ख होणारच, युद्ध विरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प यांनी ट्विटरवरून सांगतात हा सर्वात मोठा घोटाळा आहे. देशाला माहित नाही, देशाच्या प्रमुख नेतृत्त्वाला माहित नाही,
कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहिती नसेल, किती लोकांना कोणत्या पद्धतीने अंधारात ठेवलं आहे हे उघड होत आहे. हा पडद्यामागे अंधारात काय सौदा झाला हे समजायला हवे, त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे, असं राऊत म्हणाले.
चोवीस तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री दोघेहीसारखे आहेत. त्यांच्यायुद्धाशीआमचा काहीही संबंध नाही आणि नंतर चोवीस तासात ट्रम्प हे युद्धबंदची घोषणा करतात हा काय प्रकार आहे, पडद्यामागे काय सौदा झाला हे देशाला समजायला हवं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.