‘लाडकी बहीण योजने’च्या नावाखाली मोठा घोटाळा, थेट गुजरात कनेक्शन

Big scam in the name of 'Ladki Bahin Yojana', direct Gujarat connection

 

 

 

 

राज्य सरकारकडून महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना ही राबवली जातंय. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रूपये सरकारकडून दिली जात आहेत.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला.

 

मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे.

 

जुहू पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. झोपडपट्टीतील लोकांना ‘लाडकी बहीण योजना’चे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते उघडले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

 

हे लोक हे बँक खाते सायबर गुन्हेगारांना आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांना विकत होते. अशा प्रकारे त्यांनी तब्बल २५०० पेक्षा जास्त बँक खाती उघडली होती. हैराण करणारे म्हणजे आरोपी गुजरातच्या सुरत शहरातून हे रॅकेट चालवत होते.

 

या आरोपींनी मुंबईतील नेहरू नगर, डी. एन. नगर आणि धारावी यांसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना टार्गेच केले. त्यांनी फार शिक्षण नसलेल्या लोकांना लाडकी बहीण योजनेचे अमिष दाखवले

 

आणि दर महिन्याला १५०० रूपये तुम्हाला भेटणार असल्याचे देखील सांगितले. दरमहिन्याला १५०० रूपये भेटणार असल्याने लोकांनी धडाधड बॅंकांमध्ये खाते उघडली. हेच नाही तर बॅंकेत खाते उघडण्यासाठीही आरोपींनी लोकांना प्रत्येकी १००० रूपये दिले.

 

आरोपी हे खाते सायबर फ्रॉड आणि मनी लाँडरिंग करणाऱ्या लोकांना विकत होते. काही बँक अधिकारी व्यवस्थित तपासणी करत नव्हते. मात्र, पोलिसांच्या सर्तकतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला.

 

पोलिसांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त बँक खाती गोठवली आहेत. हैराण करणारे म्हणजे ही योजना लाडकी बहीण महिलांसाठी असली तरीही बॅंक खाते उघडणारे पुरूषच जास्त होते.

 

वकील सय्यद खान यांच्या पत्नीला कळाले की, लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडले की, १५०० रूपये मिळत आहेत. त्यांना नवीन सीम कार्ड वापरून बँक खाते उघडण्यास सांगितले. तसेच,

 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करण्यास सांगितले. वकील त्यांच्या पत्नीसोबत बँकेत गेले आणि त्यांनी खाते उघडले आणि आरोपींनी त्यांना १००० रूपये दिले.

 

यानंतर वकिलाने आणखी काही लोकांना खाते उघडण्यास मदत करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क केला. लोकांना त्या व्यक्तीवर संशय आला. तेव्हा लोकांनी याबद्दल जुहू पोलिसांना माहिती दिली.

 

पोलिसांनी अविनाश अमृत कांबळे या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि सर्व भांडाफोड झाली. अविनाश याने सांगितले की, त्याला एक बॅंक खाते उघडण्यासाठी ४००० रूपये मिळत होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *