शिंदेंच्या आमदारांकडून होतोय दादा गटाच्या पालकमंत्र्याचा प्रचंड विरोध

Shinde's MLAs are facing huge opposition to the guardian minister of the Dada group.

 

 

 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्या, मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.

 

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या आमदारांनी तटकरे कुटुंबाविरोधात मोर्चा उघडला आहे

 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती होईल या आशेवर असलेल्या समर्थकांना प्रचंड झटका बसल्याने त्यांनी थेटपणे मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला.

 

तसेच जिल्हाध्यक्ष आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फडणवीस यांनी पालकमंत्रिपदाच्या स्थगितीचा निर्णय घेतला. स्थगिती दिल्यानंतरही शिवसेना आमदारांनी आक्रमक सूर कायम ठेवला आहे.

 

प्रामाणिकपणे काम करून, प्रामाणिकपणे महायुतीसोबत राहून आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

 

भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.

थोरवे म्हणाले, परवा संध्याकाळी रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्यानंतर रायगडमधील शिवसैनिकांकडून उद्रेक पाहायला मिळाला.

 

तसेच सामूहिक राजीनामे झाले. तटकरे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी वरिष्ठांकडे याबाबत तीव्र नाराजी कळवली. त्यानंतर काल उशिरा आलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे सर्वानी स्वागत केले, असे थोरवे यांनी सांगितले.

 

आम्ही वरिष्ठ नेत्यांना आणि भरतशेठ गोगावले यांनाही तसे कळविले होते. रायगड जिल्हा पालकमंत्री नियुक्तीच्या स्थगितीचे आम्ही पक्षाच्या वतीने स्वागत करतो. तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देऊन आपण योग्य निर्णय घेतलेला आहे, असे थोरवे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.

 

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर भरत गोगावले आणि दादा भुसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. गोगावले समर्थकांनी तर मुंबई गोवा महामार्ग रात्रीच्या वेळेला

 

तब्बल दोन तास ऱोखून धरत मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय मान्य नसल्याचे उघडपणे सांगितले. इकडे दादा भुसे यांनीही आपली नाराजी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.

 

अखेर एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तटकरे आणि महाजन यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती केली. शिंदे यांच्या फोननंतर फडणवीस यांनीही तटकरे आणि महाजन यांना झटका दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *