सलमान खानच्या घराबाहेर गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
Confusion outside Salman Khan's house, police baton charge

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत दिसली. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. सोशल मीडियावरही सलमान खान हा चांगलाच सक्रिय दिसतो.
सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो सलमान खान याच्या घराच्या बाहेरील आहेत.
या फोटो आणि व्हिडीओमध्ये पोलिस हे लोकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घराबाहेर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे या व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक हे त्याच्या घराबाहेर पोहचले होते. मात्र, गर्दी तूफान वाढल्याने पोलिसांना लाठीचार्ज हा करावा लागला.
आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. काही लोक यादरम्यान जमिनीवर पडल्याचे देखील दिसत आहेत. लाठीचार्जनंतर गर्दी पसरल्याचे बघायला मिळाले.
सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ही गर्दी लोकांनी केली होती. दरवर्षी सलमान खान हा आपल्या चाहत्यांना ईदच्या दिवशी आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटतो.
सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केल्याचे दिसत आहे. मात्र, सतत गर्दी वाढतच होती.
आता सलमान खान याच्या घराबाहेरील हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.
हेच नाही तर बिग बाॅसला होस्ट करताना देखील सलमान खान हा दिसतो. सलमान खान हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.








