हिंदीचा मुद्दा तापला ;सहा जुलै रोजी मोर्चा
Hindi issue heats up; march on July 6


राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणाचा विरोधकांकडून टोकाचा विरोध केला जात आहे. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही,
असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.येत्या 6 जुलै रोजी मनसे पक्षातर्फे हिंदीविरोधी मोर्चा काढला जाणार आहे.
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता या मोर्चात कोण-कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सहा वर्षांच्या मुलीला गळफास देऊन पोलिस शिपायाने स्वतः केली आत्महत्या
यावरच खासदार शरद पवार यांनी भाष्य केलंय. त्यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवला जाण्याच्या धोरणाचा विरोध केला आहे.
माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदीच सक्ती नसायला हवी. असाच सगळ्यांचा आग्रह आहे. इयत्ता 5 वीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. लहान मुलांवर भाषेचा लोड किती द्यायचा, याचा विचार करावा लागेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
तसेच, मातृभाषा मागे पडली तर ते योग्य नाही. सरकारने हट्ट सोडावा. मातृभाषा हीच महत्त्वाची असायला हवी. इयत्ता 5 वीनंतर काय शिकायचं हे कुटुंबातील लोक निर्णय घेतील, असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीला कडाडून विरोध केला आहे. येत्या 6 जुलै रोजी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल.यात अनेक कलाकारही असणार आहेत.
राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप
दरम्यान, यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट पाहिलं आहे. ते काहीही चुकीचं बोलले नाहीत. कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नकोय हे त्यांमनी सांगितलं. मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलेलं नाही.
हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत.आमचा विचार निगेटिव्ह नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.त्यामुळे आता येत्या 6 जुलैच्या मोर्चाला शरद पवार उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सितारे जमीन पर चित्रपटातून बौद्धिक अक्षम विद्यार्थांना प्रोत्साहित केले
पक्षभेद विसरून मराठी म्हणून सर्वांनीच या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच सरकारचं हे त्रिभाषा सूत्र म्हणजे महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा मोठा कट असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
सितारे जमीन पर चित्रपटातून बौद्धिक अक्षम विद्यार्थांना प्रोत्साहित केले
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज यांना त्रिभाषा सूत्राची माहिती दिली. पण राज ठाकरे यांनी सरकारच्या सर्व सूचना आणि घोषणा फेटाळून लावल्या आहेत.
हिंदीला आमचा विरोध नाही. पण हिंदीची सक्ती आम्ही चालू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी दादा भुसे यांनी निक्षून सांगितल्याने दादा भुसे यांना खाली हात परतावे लागले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
अजित पवार आणि शिंदे गटात नाराजीनाट्य ;महायुतीत पडद्यामागे हालचालींना वेग
हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे. तो उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी भगिनींनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे.
मोर्चात कोणताही पक्षीय झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज यांनी केलं आहे.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
दरम्यान, दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेच्या समावेशाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्याबरोबर शिक्षण विभागातील अधिकारीही होते.
तिसऱ्या भाषेचा समावेश आवश्यक का आहे? हे आम्ही राज ठाकरेंसमोर ठेवले. त्यांना आमची भूमिका मान्य नाही असं दिसतं आहे.
आजची चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहेचवणार आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, असं दादा भुसे यांनी सांगितलं.
आता मोटारसायकललाही भरावा लागनार टोल टॅक्स
यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. राज यांची हिंदीबाबतची नकारात्मक भूमिका आहे. कला आणि क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे, असंही भुसे यांनी सांगितलं.