हॉट एअर बलूनला आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू ;पाहा VIDEO मृत्यूचा थरार
Hot air balloon catches fire; 8 people die of suffocation; watch VIDEO, the thrill of death


हॉट एअर बलूनला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातातून १३ जण बचावले. दक्षिण ब्राझीलमधील सँटा कॅटरिना जिल्ह्यात ही घटना घडली.
पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या मंत्र्याची अघोरी पूजा;महाराष्ट्रात खळबळ
दुर्घटनेतून बचावलेल्या १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सँटा कॅटरिनामधील लष्कराच्या अग्निशमन दलानं ही माहिती दिली.
मातोश्री’वरून सर्वात मोठी अपडेट;शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? ‘
शनिवारी सकाळच्या सुमारास हॉट एअर बलूनला आग लागली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू होऊन १३ जण बचावल्याची माहिती राज्यपाल जॉर्गिन्हो मेल्लो यांना दिली.
जगातले 10 सर्वात असुरक्षित देश
‘प्रॅया ग्रँडमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या घटनेनं आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आमची बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आलेली आहे,’ असा तपशील मेल्लो यांनी एक्स पोस्ट करुन दिला.
दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला रंगेहात अटक
हॉट एअर बलूनला आग लागली तेव्हा त्यात एकूण २१ जण होते. बलूननं पेट घेतल्यानंतर त्याचा स्फोट झाला. अपघात घडला त्यावेळी बलून पर्वतीय भागात होता.
इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका;पाकिस्तानमध्ये 3 मोठे ब्लास्ट, काय आहे प्रकरण ?
त्यामुळे आता बचाव पथकांकडून या भागात शोध आणि मदतकार्य सुरु आहे. हॉट एअर बलूनच्या अपघाताचे थरारक व्हिडीओ समोर आलेले आहेत. बलूननं पेट घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. यानंतर बलूनमधून धूर निघू लागतो.
सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले,म्हणाल्या अजूनही उशीर झालेला नाही’
यानंतर पुढील काही क्षणांमध्ये हॉट एअर बलूनला लागलेलं बकेट जमिनीच्या दिशेनं कोसळू लागतं. पर्यटक उभे असलेल्या बकेटला आग लागलेली असते.
महविकास आघाडी फुटणार ?संजय राऊत म्हणतात ;राज्यात दोनच समविचारी पक्ष
अवघ्या काही सेकंदांमध्ये पेटतं बकेट खाली पडतं. या अपघातामुळे हॉट एअर बलूनमधील सुरक्षा, त्यांच्या क्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
शरद पवार गटाच्या आमदाराकडून अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात
हॉट एअर बलूनला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध सुरु आहे. त्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
1 जुलैपासून PAN कार्ड बनविण्याचे नियम बदलणार
प्रॅया ग्रँड परिसर हॉट एअर बलून च्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी जूनमध्ये हॉट एअर बलून फेस्टिवल भरतात. कॅथलिक संत जॉन यांच्या स्मरणार्थ या फेस्टिवलचं आयोजन केलं जातं.
पत्रकारांच्या “त्या” प्रश्नावर अजितदादांचा काढता पाय
NOW – Hot air balloon crashed in Praia Grande, Brazil.pic.twitter.com/a0BveukfAU
— Disclose.tv (@disclosetv) June 21, 2025








