इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका खाद्यतेलाला; महागाईची फोडणी
Iran-Israel war hits edible oil; inflation spikes


इराण-इस्त्रायल संघर्ष थांबण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीत. या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे. या युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.
हॉट एअर बलूनला आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू ;पाहा VIDEO मृत्यूचा थरार
शांततेसाठी बोलणी सुरू असली तरी हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहे. युद्धाचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागले आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असतानाच
पत्रकारांच्या “त्या” प्रश्नावर अजितदादांचा काढता पाय
आता खाद्यतेलाने महागाईच्या मोर्चावर पहिली आघाडी उघडली आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे.
इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत.
राज्यात आणखीन एक IAS अधिकारी गोत्यात
त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर, किलोच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्याने कमी केले होते. त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते.
मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे खनिजतेलाच्या किमती बॅरलमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांत वाढ झाली. जगभरातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे.
राज्यात आणखीन एक IAS अधिकारी गोत्यात
सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने भूराजकीय तणाव, जागतिक अस्थिरता, खासकरून इराण-इस्त्रायल युद्धामुळे खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती.
युद्धविरामची घोषणा होताच सोने – चांदीचे दर गडगडले
खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची भीती खरी ठरली. खाद्यतेलाचा पुरवठा करणारे जहाज अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची गती मंदावली आहे.
राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप
त्यातच इराणच्या संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मूज जलमार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर केला. अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होईल.
मागणी आणि पुरवठा याचे गणित न जुळल्यास अनेक वस्तूंच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. तर काहींच्या मते, रशिया, चीन, तुर्कीची मध्यस्थी हे युद्ध थांबवू शकते.
हिंदीवरून महायुतीचे सरकार अडचणीत ; संजय राऊत भडकले; शिंदेंना ओपन चॅलेंज
इराण अणू ऊर्जा कार्यक्रमाविषयी माहिती देण्यास राजी होऊ शकतो. जगाला कोणतेही युद्ध परवडणारे नाही अशी सर्वच देशांची भूमिका आहे.