महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
Heavy rain alert in Maharashtra for next 5 days

राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवस आधी जोरदार सुरु असलेला पाऊस एकदम कमी झाला होता.
संजय राऊत यांच्या जगदीप धनखड यांच्याबाबतच्या दाव्याने एकच खळबळ
आता मात्र पुढील काही दिवस राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. हवामान विभागाने त्याबाबत अलर्ट जारी केला आहे.
राहुल, प्रियांका गांधींसह अनेक खासदारांना अटक, राजकारण तापणार
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारकडून ‘या’ 2 सुट्ट्या रद्द
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे.
१३ तर १८ ऑगस्ट दरम्यान कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीने विदर्भात चंद्रपूर, वर्धा, नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापुरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
१५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी तुमच्या जिल्ह्यातील ध्वजारोहण मंत्री करणार ,सरकारकडून यादी जाहीर
पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.





