महाराष्ट्रात दूध व्यावसायासाठी नवे 8 नियम लागू

8-new-rules-implemented-for-the-dairy-business-in-maharashtra

 

 

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत एफडीकडून अनेक हॉटेल आणि जिथे -जिथे अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय आहे,

ACB ची जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारी

अशा अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान तुकारम मुंढे यांनी आता आपला मोर्चा हा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. त्यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. दूध विक्रेत्यांसाठी नवे 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत, अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली

 

तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळ संदर्भात काही आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांकडे वळवला असून आदेशासंदर्भात पत्रकार परिषदेतून सविस्तर माहिती दिली आहे.

10 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

सुरक्षित, शुद्ध सकस आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदशक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दूध प्रक्रियेतील इको सिस्टम, शेतापासून ते ताटापर्यंत यावर काम करावं लागणार आहे,

 

त्यासाठी काही नियम लागू केले आहेत. दूध संकलन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आईस्क्रीम विक्रेते यां सगळ्यांना हे नियम लागू असणार आहे.

 

बंडखोर खासदार 6 संजय जाधव यांना मोठी लॉटरी लागणार ,पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा ?

काय आहेत नवे 8 नियम?
संपूर्ण पुरवठा साखळीवर एकसमान अंमलबजावणी : दूध संकलन केंद्र, बल्क मिल्क कूलर, चिलिंग सेंटर, डेअरी, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते या सर्वांवर समानपणे आदेश लागू राहील.

 

 

कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी स्वतंत्र नियम : कच्च्या (Raw) दुधाची विक्री केवळ विहित अटींचे पालन करूनच करता येईल. प्रत्येक पात्रावर “RAW MILK” असा स्पष्ट उल्लेख करणे तसेच “हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे” अशी सूचना देणे बंधनकारक राहील.

सहा बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका तडकाफडकी फेटळाली
पाश्चराइज्ड दुधासाठी सुरक्षित पॅकेजिंग : पाश्चराइज्ड, प्रमाणित किंवा इतर उष्णताप्रक्रिया केलेले दूध केवळ सीलबंद, लेबलयुक्त व Tamper-Evident पॅकेजिंगमध्येच विक्री करता येईल.

उपकरणे : दूधाचे संकलन, वाहतूक, साठवणूक व हाताळणीसाठी केवळ अन्न-श्रेणीतील (Food Grade) स्टेनलेस स्टील अथवा मान्यताप्राप्त साहित्याची पात्रे वापरणे बंधनकारक राहील.

शीतसाखळीचे पालन : दूध प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर विहित तापमानात शीतकरण करणे, वाहतूक व साठवणुकीदरम्यान तापमान नियंत्रण राखणे तसेच तापमान नोंदी नियमित ठेवणे आवश्यक राहील.

विलीनीकरण लांबले?,तांत्रिक बाबीं पूर्ण करणार
Traceability प्रणाली : दूध कोणत्या उत्पादकाकडून प्राप्त झाले, कोणत्या वेळी संकलित झाले, कोठे वाहतूक झाले व अंतिम विक्रीपर्यंत कोणत्या मार्गाने गेले याची संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक राहील.

वैद्यकीय तंदुरुस्ती : अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वैध वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.

खासदारांनंतर आता उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार?
: अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS), HACCP तत्त्वे तसेच FoSTaC प्रशिक्षित पर्यवेक्षक यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे प्रत्येक संबंधित अन्न व्यवसायाची जबाबदारी राहील.

Related Articles