ACB ची जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारी

ACB raids District Collector's residence.

 

 

महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहरातील मूळ रहिवासी तथा सध्या अकोला येथे मुंद्राक जिल्हाधिकारी असलेले किरण चौधरी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

 

लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झालेली असून या प्रकरणातील तपासाला आता नवे वळण लागलं आहे. सह जिल्हा निबंधक प्रथम मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी

मान्सून अडकला हे 5 जिल्हे कोरडे राहणार

यांच्या जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंट मधील सीलबंद घरामधून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याच चुलत्याने केला होता. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. अखेर एसीबीकडून चौधरी यांच्या घराची झाडाझडती घेतली.

 

तब्बल 24 तासहून अधिक ही कारवाई चालली. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली आहे.

खासदारांनंतर आता उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार?

या झाडाझडतीत महत्वाचे दस्तऐवज आणि रोख दागिने हाती लागल्याची चर्चा आहे. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात किरण पुरुषोत्तम चौधरी (सहजिल्हा निबंधक

 

तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, वर्ग-1) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. काल जळगाव येथील राहते घराची झडती करण्यासाठी अकोल्याचे एसीबीकडून अधिकारपत्र प्राप्त होते.

आता पासपोर्ट, आधार, मतदानकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही

25 जून रोजी अकोला आणि जळगाव एसीबी पथक चौधरी यांच्या घरी गेले असता सदर घर बंद अवस्थेत मिळून आले. ते पंचांसमक्ष सिलबंद करण्यात आलेले होते.

 

दरम्यानच्या काळात 27 जून रोजी चौधरी यांच्या नातेवाईकांनी सिलबंद असलेले घराचे मागील गॅलरीचे व घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करण्याच्या व पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने आत प्रवेश केला होता.

आता ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या गळाला?

तेव्हा त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याबाबत गुन्हा दाखल आहे. काल 2 जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनीषा किरण चौधरी आणि त्यांचे नातेवाईक, दोन शासकीय पंच, गोल्ड व्हॅल्यूअर, बँक कॅशियर यांचे समक्ष राहते घराची झडती घेतली असता खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

 

1) 1,53,84,630/- रोख रक्कम ( त्यात 500,200,100, 50, 20 रुपयांच्या नोटा )

2) 60,57,135/- रुपये किमतीचे 422.100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. ( त्यात 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन बिस्किट्स व इतर दागिने)

मंत्रिपदासाठी बंडू’ जाधव यांचे नाव आघाडीवर

3) 11,52,745/- रुपये सोने खरेदी केल्याच्या पावत्या

4) 31,416/- रू किंमतीचे एकूण 154.100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने

 

5) 62,13,376 /- रुपये किं. चे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे व कुटुंबातील सदस्यांचे नावे प्रोपर्टी असल्याचे खरेदीखत, बक्षिसपत्रे इ कागदपत्रे

6) 06,25,545/- घर झडती घेतलेल्या घरातील वस्तूंची किमंत

1 जुलैपासून नियम बदलणार, खिशावर पडणार ताण ?

एकूण 2,94,64,847 रुपये किमतीचे सोन्याचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम व प्रॉपर्टी चे कागदपत्रे मिळून आले असून सदरचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत.

 

Related Articles