साखर ८० रुपये ,पहा कोणत्या शहरात किती रूपये किलो साखर
Sugar at ₹80; check the price per kilogram in different cities.

सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे.
सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ झाली आहे. साखर 7 हजार 500 प्रति क्विंटलवर गेली आहे. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत.
याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. साखर दरवाढीनंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; महागाईचा भडका उडणार
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद आहे, साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता, मात्र हे पैसे शेतकऱ्यांना नाहीतर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत,
दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतकं असताना अचानक दर कसे काय वाढले असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
अचानक साखरेच्या दरांमध्ये जे काही उसळी घेतलेली आहे, ती कुठंतरी संशयास्पद आहे. कारण यावर्षी एकूण पीक पाहणी पाहता, पुढील सिझनमधे देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे तर स्पष्ट आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दारुडा मुख्याध्यापक निलंबित
सरकारनं कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा, ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही आणि जी शिल्लक साखर आहे,
जे रेकॉर्ड आज सरकार दाखवतंय, साखर कारखाने दाखवतात, ते बघितलं तर अगदी दिवाळी होऊन सुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहते, असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पद रीत्या उसळी मारणं, हे कुठंतरी पाणी मुरत असल्याचं दिसतंय, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; महागाईचा भडका उडणार
पुढे राजू शेट्टी यांनी बोलताना म्हटलं की, मुळामध्ये मी एक शेतकरी नेता आहे. मला साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे होता, झालेलाही आहे.
परंतु लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडं आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केलेला आहे.
याचाच अर्थ असा होतो की, कुठंतरी साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे आणि आता जे काही मार्केटमध्ये साखर जाणार आहे,
15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार;आदित्य ठाकरेंच्या दाव्याने खळबळ
ती जुजबी किरकोळ कारखान्यांचीच साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चोरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते,
तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे, म्हणजे हे पैसे रिकव्हरी चोरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या घशात जाणार आहेत, व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत.
भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; महागाईचा भडका उडणार
खरं तर हे साखरेचे दर बघितले, तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत.
मला माहित आहे की, आधीची साखर कमी दराने विकलेली असली, तरीसुद्धा शिल्लक साखरेला मिळणारा दर जर संपूर्ण वर्षभराच्या गाळप झालेल्या उसावरून विभागला तरीसुद्धा 400 ते 500 रुपये आरामात ऊस उत्पादकांना द्यायला काय अडचण नाही.
रामदेव बाबा कंगना रनोतवर भडकले
परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही, कारण आमची साखर आधीच विकून गेलेली आहे. त्यामुळे सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे,
हे बघितलं पाहिजे आणि आता अचानक साखरेची जी वाहतूक होते, ती वाहतूक होत असताना ते ट्रक्स सुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडं पावत्या आहेत का? बिनपावतीच्या जीएसटी चुकवलेली ही साखर मार्केटमध्ये फिरायला लागलीय हे सुद्धा तपासलं पाहिजे.
नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले ,जनतेत धावपळ
कुठंतरी 20-22 हजार कोटी रुपयांचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागलाय असा संशय घ्यायला जागा आहे, असंही पुढे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साखरेचे किती दर?
मुंबई – काही ठिकाणी 60 काही ठिकाणी 65 रुपये किलोने साखर दर
सांगली- 80 रुपये किलो
बुलढाणा- 80 रुपये किलो
वाशिम- 80 रुपये किलो
कोल्हापूर-75 रुपये किलो
आता आमदारांना कार, इंधन, ड्राइव्हरसाठी दरमहा 75000 रुपये
नाशिक- 75 रुपये किलो
पुणे – 72 रूपये किलो
परभणी- 70 रुपये किलो
सातारा- 70 रुपये किलो
पालघर- 70 रुपये किलो
भंडारा – 70 रुपये किलो
जळगाव – 68 रुपये किलो
अकोला- 65 रूपये किलो
रत्नागिरी – 62 रुपये किलो
चंद्रपुर – 60 रुपये किलो
नांदेड – 65 रुपये किलो
बापरे.. बाबा रामदेव खासदार कंगनाला म्हणाले विकृत
पालघर – 65 ते 70 रुपये प्रति किलो
लातूर – 70 रुपये किलो
हिंगोली – 70 रुपये किलो
वाशिम प्रति 78 ते 80 रु प्रति किलो
नागपूर 68 ते 70 रु प्रति किलो
बुलढाणा 78 रु ते 80 रु प्रति किलो
गोंदिया 70 रु प्रति किलो
भंडारा 68 रु प्रति किलो
वर्धा 62 ते 64 रुपये प्रति किलो
अकोला 65 रुपये प्रति किलो
चंद्रपूर 60 प्रति किलो
अमरावती 75 रु प्रति किलो
यवतमाळ 75 ते 78 रु प्रति किलो
गडचिरोली 60 रुपये प्रति किलो








