गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना कुंभमेळा घोटाळा प्रकरणात अटक
Two relatives of Girish Mahajan arrested in the Kumbh Mela scam case.
कुंभमेळा घोटाळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना अटक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. दरम्यान हा गुन्हा अक्षम्य आहे, नातेवाईक असला तरी गय करणार नाही, अशी प्रक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली आहे.
शिवसेना कोणाची , कपिल सिब्बल यांचे 19 युक्तिवाद; आज सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?
35 हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावरून विरोधकांसह साधूंनी देखील प्रश्न उपस्थित केले असताना आता कुंभमेळ्याच्या नावाने राज्यात फसवणुकीचं रॅकेट देखील सुरू झालं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर सरकारने नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवून ज्यांना कुंभमेळा मंत्री केलं, त्या गिरीश महाजन यांचा नातलगच या घोटाळ्यात मास्टमांईड असल्याचं समोर आलं आहे.
राजकारणात समीकरण बदलणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना
बनावट वर्क ऑर्डर तयार करुन तीन कोटी 5 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं तब्बल 591 कोटींची काम दाखवून वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे.
या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातून तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच वर्क ऑर्डर समोर आलेल्या आहेत.
आता सीजेपीच्या मागे लागली ईडी…पडद्यामागे मोठ्या हालचाली!
या वर्क ऑर्डरची किंमती ही कागदावर त्यांनी 591 कोटी रुपये दाखवली आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तो माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला आहे. पूर्वीपासूनच त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मला वाटतं यामध्ये सात ते आठ लोक सापडतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत,
MPSC चा टॉपर पण अडकला लाचेच्या जाळ्यात
कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून सातत्याने कुभमेळाव्याच्या नियोजनावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून देखील कुंभमेळा चर्चेत आला होता.









