आता सीजेपीच्या मागे लागली ईडी…पडद्यामागे मोठ्या हालचाली!

Now the ED is after CJP... major developments unfolding behind the scenes!

 

 

कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने दिल्लीत उभारलेल्या आंदोलनाची फक्त भारतच नव्हे तर जगभरात चर्चा झाली. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला बॅकफुटवर जावे लागले.

राज ठाकरेंची टीका, म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे

याच आंदोलनाचा दबाव वाढल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फक्त भारतच नव्हे तर इतर देशातील तरुणाईनेही या सीजेपीच्या आंदोलनाचे कौतुक केले.

 

भारतातील जेन झी तरुणांनी तर सक्रियपणे सहभागी होत सरकारला धारेवर धारलं. दरम्यान आता हे आंदोलन संपल्यानंतर सीजेपीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सीजेपीला परदेशातून दिल्या जाणाऱ्या देणगीची चौकशी केली जाणार आहे.

.अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

सीजेपीला कथितपणे मिळालेल्या परदेशी देणगीविषयी राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हे आंदोलन संपल्यानंतर आता राज्य सरकारकडून तसेच केंद्रात ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे,

 

असं त्यांनी सांगितलंय.  राज्यमंत्री ‘CJP सह काही संस्थांच्या फॅारेन फंडिंगची चौकशी सुरु झालेली आहे. महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी केली जात आहे.

 

परदेशातून देणगी मिळवणे यात गैर नाही. पण त्याच देणगीचा देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार,’ असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिसांनी शेवटी पत्ता फेकलाच ,विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा थेट पाकिस्तानसोबत संबंध?

परदेशातून देणगी घेणाऱ्या राज्यातील सीजेपीसह इतर संस्थांचीही सखोल चौकशी सुरू झाली आहे. या संस्थांचे खाते तपासले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

 

राज्य सरकारच्या या निर्णयावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला परदेशातून देणगी येत असेल आणि त्याचा चुकीचा वापर केला जात असेल तर हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा;अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच

दरम्यान, आता सीजेपीच्या देणगीची चौकशी सुरू झाल्यानंतर आता त्यातून नेमकं काय समोर येणार? सीजेपीच्या अडचणी वाढणार की सरकार तोंडावर आपटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Related Articles