सऊदीचा धक्कादायक निर्णय,जगाची झोप उडाली
Saudi Arabia's shocking decision leaves the world sleepless.

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर तणाव वाढला. ज्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
विमान हेलिकॉप्टरला धडकलं, विमानाचे हवेतच तुकडे
त्यातच आता सऊदी अरेबियाने असा एक निर्णय घेतला ज्याने भारताची झोप उडाली. सऊदी अरेबियाने थेट होर्मुज खाडीला बायपास करून जाणारी सर्वात महत्वाची पाईपलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला.
ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. तीन टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किमती एका झटक्यात वाढू शकतात.
सऊदीच्या विदेश मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इराकने रियाद आणि मदीना येथील पाईलपालाईनला निशाणा बनवले. त्यानंतर त्यांनी ही पाईपलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला. वाद अधिक वाढताना दिसत आहे.
जगावर कोरोनापेक्षाही मोठे संकट; हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
कच्च्या तेलाच्या किंमती 108 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचल्या आहेत. सऊदीच्या विदेश मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ईस्ट वेस्ट पाईपलाईनला निशाणा बनवण्यात आल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
काही लोक गंभीर जखमी झालेत. सऊदीने स्पष्ट केले की, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांनी ही पाईपलाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पाईपलाईनच्या मदतीने दररोज 50 ते 70 बॅरल तेल घेऊन जाऊ शकते.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
अमेरिका इराण यांच्यातील संघर्षामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आता पाईपलाईन बंद केल्याने जागतिक बाजारावर संकट आहे. तज्ज्ञांच्या मते, पाईपलाईन बंद झाल्याने मोठे संकट उभे आहे.
कच्च्या तेलाचा पुरवठा अचानक कमी झाल्याने भारतीय तेल कंपन्याही तणावात आहेत. जर ही पाईपलाईन काही दिवस बंद राहिली तर कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचली.
डीजेच्या दणदणाटामुळे थेट मंत्र्यालाच बहिरेपण
भारत हा कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अबलंबून आहे. ज्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठारदार शोधावे लागणार आहेत. जर स्थिती अशीच राहिली तर भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात स्थिती गंभीर आहे
. भारताच इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसली. त्यात आता मोठी धोक्याची स्थिती पुढे उभी आहे.








