मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Manoj Jarange's warning to Eknath Shinde.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना मोठा इशारा दिला आहे.
मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच फेरबदल , दोन डझन मंत्री बदलणार
मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडत असाल तर तुम्ही खूप लवकर संपाल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला.
“तुम्हाला आरक्षण द्यायचं जिवावर आलं. तुम्हाला मराठ्यांना संपवायचं आहे ही तुमची भूमिका आहे. तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त आंदोलन मोडीत काढण्याचं षडयंत्र करत आहात.
आता आमदारांना कार, इंधन, ड्राइव्हरसाठी दरमहा 75000 रुपये
तुम्ही हारलेले आहात. तुमचा नाकार्तेपणा सिद्ध झाला आहे. तुम्ही सपशेल हारले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही हे तुम्ही स्पष्ट संगायला पाहिजे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून प्रमाणपत्र रद्द करुन घेतले. तेव्हा तुमचे मराठे कुठे गेले? तुम्ही म्हणता ना त्यांच्याकडेदेखील मराठा समर्थक आहेत. तुमचेच मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले ना? जे समर्थक समोर येत आहेत, शिंदे त्यांना समोर आणत आहेत.
साखर खरेदीवर निर्बंध आता 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही
जात प्रमाणपत्र रद्द व्हायला लागले असताना मराठ्यांना कळत नाही का संजय शिरसाटांना बोलायला पाहिजे. तुमची जातच पक्ष आहे का? जे शिंदेंचे समर्थक आहेत त्यांनी प्रमाणपत्र रद्द केले त्यांना सांगावं”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“एकनाथ शिंदेंना म्हणावं की, हे नाटकं खेळू नका. मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडायचं हे नाटक खेळू नका. असं केलं तर खूप लवकर संपाल. एकनाथ शिंदेंना म्हणा, लवकर शहणे व्हा. आणखी हातातून गेलं तर एका फटक्यात संपाल”, अशा इशारा जरांगे यांनी दिला.
साखर खरेदीवर निर्बंध आता 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही
“तुम्ही संभाजीनगरमध्ये बसून दंगल करायचं ठरवलं आहे. मी हे परवा सांगितलं आहे. हे सगळ्यांचं मिळून षडयंत्र आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेगळे लोकं चर्चेला यायचे आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडे वेगळे लोकं चर्चेला यायचे.
एकनाथ शिंदेंना मराठा मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या आहेत. याला पूर्ण एकनाथ शिंदे जबाबदार राहणार आहेत”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
मोदी सरकारच्या 22 हजार कोटींची कर्जमाफीला बँकांचा नकार
“संयम सोडून तुम्ही मराठ्यांचं काय करणार? महाविकास आघाडीसह तुम्ही एकत्र या. येत्या 12 सप्टेंबरला निर्णय होणारच आहे. उदय सामंत यांना दोन महिन्यांपासून सांगतोय की, प्रमाणपत्र द्या.
एकनाथ शिंदे आणि माझे संबंध पहिल्यारखे राहतील. तुमची तळमळ तुमच्या नेत्यासाठी, माझी तळमळ मराठ्यांच्या लेकरांसाठी आहे. तुमच्यात आणि आमच्यात हा फरक आहे”, असं जरांगे म्हणाले.









