जमजम कॉलनी ,पारवा गेट परिसरात नवीन डीपी बसविण्याची मागणी

Demand for the installation of a new distribution transformer (DP) in the Jamjam Colony and Parva Gate area.

 

 

परभणी;शहरातील पारवा गेट,जमजम कॉलनी परिसरात डीपी वरील विद्युत भार वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे.परिसरातील विजेची समस्या दूर करण्याकरिता जमजम कॉलनी येथे नवीन डीपी बसवण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे

 

याबाबत माहिती अशी की परभणी शहरातील पारवा गेट जमजम कॉलनी येथे एकच डीपी आहे त्याचा क्रमांक 443854423 आहे ही डीपी गेल्या दहा वर्षांपूर्वी बसवलेले असून, दहा वर्षात या परिसरामधील लोकसंख्येमध्ये चार पटीने वाढ झालेली आहे ,

 

घरे विस्तारलेली आहेत परंतु विद्युत मंडळाकडून याकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात येत असून या संदर्भात परिसरातील जनतेकडून परीक्षा परिसरातील दक्ष नागरिक शेख रसूल शेख अमीन यांनी

 

डीपीवरील भार कमी करण्यासंदर्भात ,वेळोवेळी होणारा खंडित वीजपुरवठ्यापासून मुक्तीसाठी दोन डीपी करण्यासंदर्भात शहर घेऊन शाखेला सहा विनंती पत्र दिली .सोबतच कार्यकारी अभियंता , अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांना सुद्धा याबाबतची मागणी करणाऱ्या विनंत्या केल्या .

 

परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेच्या धोरणामुळे अद्याप पर्यंत या परिसरात नवीन डीपी बसवण्यात आलेला नाही ,त्यामुळे डीपीमध्ये दररोज फॉल्ट होऊन वेळोवेळी वीजपुरपूरवठा खंडित होतो,

 

नेहमीच्या या प्रकारामुळे डीपी कधीही जळण्याची शक्यता नाकारता येत नाही ,कारण की डीपीवर लोड जास्त असल्यामुळे डीपीमध्ये फॉल्ट होऊन डीपी जळू शकतो,

 

याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन समजून कॉलनी पारवा गेट परिसरात विजेच्या भारानुसार  डीपी बसविण्यात यावा अशी मागणी शेख रसूल शेख अमीन यांनी केली आहे

 

 

Related Articles