परभणी- हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी डॉ नावंदर यांना
Dr. Navandar Nominated for Parbhani-Hingoli Legislative Council Seat


विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या 17 जागांमध्ये परभणी हिंगोली मतदारसंघाची निवडणूक देखील जाहीर झाली आहे.
एकीकडे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीनं मात्र ही निवडणूक लढवायची भूमिका घेत प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचं निश्चित केलं आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू,
त्यानुसार महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 17 पैकी 6 जागा आल्या आहेत. यामध्ये परभणी हिंगोली मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणी हिंगोली मतादारसंघासाठी डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीकडून परभणी हिंगोली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
70 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. विवेक नावंदर ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगरप्रमुख आहेत.
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, हिंदुहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,
1 लाखाची लाच एसीबीनं शिकवला धडा
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – 2026 साठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येत आहे.
डॉ. विवेक नावंदर हे परभणी शहरातील उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख असून पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावत आहेत.त्यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोली मतदारसंघातील निवडणूक राजकीयदृष्ट्या अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ
महाविकास आघाडीने या निवडणुकीत डॉ. नावंदर यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नावंदर यांच्या नावाच्या घोषणेनंतर महायुतीकडून अधिकृत उमेदवार कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जण स्पर्धेत
परभणी हिंगोली मतदारसंघात महायुतीत हा मतदारसंघ कोणाला सोडला जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ सर्वाधिक आहे.
या जोरावर त्यांनी जागा मिळावी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे परभणी हिंगोली मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेकडे होते. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ही जागा मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
पावसाचे तर सोडाच ,जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
या मतदारसंघात विप्लव बाजोरिया यापूर्वी आमदार होते. त्यांच्याकडून देखील या जागेवर उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस : 131
भाजप :99
शिवसेना (शिंदे) : 76









