70 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
Sword of Disqualification Hangs Over 70 Corporators


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पालिकेवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व मोडीत काढत इथं महायुतीने सत्ता काबीज केली आहे. या निवडणूक निकालानंतर आता कुठे सभागृहाचं कामकाज सुरळीत सुरू झालं आहे.
मात्र आता महापालिकेत महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ७० नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जण स्पर्धेत
मिळालेल्या माहितीनुसार, विविध राजकीय पक्षांच्या ७० हून अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
या कायदेशीर लढाईमुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचे गणित कोणत्याही क्षणी बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच महापालिकेतील भाजपची सत्ताही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पावसाचे तर सोडाच ,जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई महापालिकेतील सर्वाधिक याचिका कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांविरोधात दाखल झाल्या आहेत?
Aएमआयएम
Bकाँग्रेस
Cशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Dभारतीय जनता पक्ष
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापालिकेतील सर्व पक्षांच्या एकूण ७० नगरसेवकांविरोधात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.
15 राज्यांना 90 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाचा मोठा इशारा
सर्वाधिक याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांविरोधात दाखल झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या तब्बल २४ नगरसेवकांचे पद धोक्यात आले असून, त्यापैकी ११ प्रकरणे ही थेट जात पडताळणीशी संबंधित आहेत.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाही (भाजपा) अशा याचिकांचा मोठा सामना करावा लागत आहे. भाजपच्या १८ नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल असून, त्यातील ९ याचिका या जात पडताळणीशी संबंधित आहेत. याशिवाय काँग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी १, तर शिवसेना (शिंदे गट) आणि एमआयएम (MIM) यांच्या प्रत्येकी ७ याचिका दाखल झाल्या आहेत.
राष्ट्रवादीत पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?
यात शिंदे गटाची ३ आणि एमआयएमची ४ प्रकरणे जात पडताळणीची आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) २ याचिकांपैकी १, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी १ नगरसेवकावर जात पडताळणीची टांगती तलवार आहे.
सध्याच्या मुंबई महापालिकेतील राजकीय गणिताचा विचार केला तर भाजप-शिंदे युतीकडे एकूण ११८ नगरसेवक आहेत, ज्यामध्ये भाजपचे ८९ आणि शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांचा समावेश आहे. हा आकडा बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ या मॅजिक फिगरपेक्षा केवळ ४ जागांनी जास्त आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू,
अशात भाजपच्या १८ पैकी काही नगरसेवकांवर जात पडताळणीची कारवाई झाली, तर त्यांचं महापालिकेतील सत्तेचं गणित बिघडू शकतं. महायुती बहुमतापासून दूर जाऊ शकते. कारण जात पडताळणी आणि आरक्षणाच्या नियमांबाबत आयोग नेहमीच अत्यंत कठोर राहिलं आहे.








