राष्ट्रवादीत पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?

Why did Chhagan Bhujbal lash out over Parth Pawar's interference in the NCP?

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून तीव्र वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

 

अन्नधान्य पुरवठ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत एका विशिष्ट कंत्राटदाराला संधी देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

पावसाचे तर सोडाच ,जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

सूत्रांच्या माहितीनुसार, यासंदर्भात झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांनी संबंधित टेंडरबाबत आग्रह धरला. मात्र, अनुभवी नेते छगन भुजबळ यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे स्पष्ट करत कठोर भूमिका घेतली.

 

“प्रशासन आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते हे मला शिकवू नका, अशा शब्दांत भुजबळ यांनी संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे बैठकीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

 

जरांगेचे उपोषण सुरू होताच मोठा अधिकारी निलंबित
गेल्या ६ महिन्यांपासून पार्थ पवार यांच्याकडून पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि शासकीय कामांमध्ये वेगवेगळ्या पद्ध‌तीने हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवारांनी थेट मंत्र्यांकडेच गेल्या ६ महिन्यांत मंजूर झालेली टेंडर्स, वाटप झालेला निधी आणि विकासकामांची सविस्तर डेटा मागवला आहे.

 

पक्षाची कोणतीही अधिकृत घटनात्मक जबाबदारी किवा शासकीय पद नसताना, केवळ दादांचे सुपुत्र म्हणून अशा प्रकारे बेट मंत्र्यांना जाब विचारल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत.

 

15 राज्यांना 90 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाचा मोठा इशारा
या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

 

मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या या धुसफुशीमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत, ज्यामुळे विरोधकांच्या हाती मोठे कोलीत सापडले आहे.

ट्रम्पचे पंख स्वत:च्याच पक्षाच्या खासदारांनी छाटले;

संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला,

 

मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या या धुसफुशीमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

 

ट्रम्पचे पंख स्वत:च्याच पक्षाच्या खासदारांनी छाटले;
मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात वाद असल्याच्या चर्चाना अहितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी फेटाळून लावले, माध्यमांमध्ये सुत्रांच्या हवाले येणाऱ्या बातम्यांवर त्यानी नाराजी व्यक्त करत, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही.

 

भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पक्ष संघटनेच्या बैठका घेत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र कोणतीही ठोस चर्चा नसताना नकारात्मक बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक बातमी सुत्रांच्या हवाले येत आहे.

 

Related Articles