आता ओबीसींचा स्वतंत्र पक्ष ?

A separate party for OBCs now?

 

 

राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भाने आरक्षण सुरू असून ते सध्या मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

 

मात्र, जरांगे पाटलांच्या आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं असून सरकार जरांगे पाटलांना फसवत असल्याचं आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. तर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार,

शाळेत विद्यार्थ्यांना कांदा-लसूण, खाण्यावर बंदी

मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ओबीसींचे आरक्षण हिरावून घेतले जात असून, “ओबीसींचे आरक्षण संपले आहे, हा माझा दावा आहे,” असे हाके यांनी म्हटले.

 

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. मागासवर्गीय समाजातील लोकांचे दाखले काढले गेले असून, ओबीसी समाज असंघटित असल्याने केवळ मतांसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप हाके यांनी केला. ओबीसी नेतेही या प्रश्नावर मूग गिळून बसले आहेत.

जगावर कोरोनापेक्षाही मोठे संकट; हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट

खासदार विशाल पाटील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देत एकप्रकारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवल्याचे हाके म्हणाले. मात्र, सध्या मराठा समाजात कोणते आरक्षण स्वीकारायचे, यावरून संभ्रम निर्माण झाला असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

“मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाचे बळ वाढवले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून ठेवला आहे,” असा आरोप हाके यांनी केला. महाराष्ट्रात संविधानविरोधी भूमिका घेतल्या जात आहेत.

सऊदीचा धक्कादायक निर्णय,जगाची झोप उडाली

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी, “जरांगे, तुमचा लढा मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी आहे. मात्र, ओबीसींच्या लेकराबाळांचा बळी देऊन तुम्हाला हा लढा जिंकायचा आहे का?” असा सवाल उपस्थित केला.

 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरही हाके यांनी प्रश्न उपस्थित केला. “पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन कसे करू शकतात? ते मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील आमदार आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

BREAKING NEWS;42 रेल्वेगाड्या रद्द, 25 गाड्यांचा मार्ग बदलला ; पाहा संपूर्ण यादी

धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गातील समावेश आणि आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजानेच भूमिका घेण्याची जबाबदारी आहे. “ओबीसी समाज एकत्र आला,

 

तर अनेकांचे डिपॉझिट जप्त होईल. वेळ पडली तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही शेवटची टर्म असल्याचे सांगत त्यांनी डिलिमिटेशन कायदा लागू करण्याची मागणी देखील यावेळी केली.

 

 

Related Articles