महाराष्ट्रात दुहेरी संकट,२४ तासांत हवामानाचा होणार मोठा बदल

Double crisis in Maharashtra; major weather shift expected within 24 hours.

 

 

राज्यातील हवामानात पुढील २४ तासांत बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ सप्टेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

तर उर्वरित १५ जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी पाऊस आणि कोरडे हवामान असे दोन्ही चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सऊदीचा धक्कादायक निर्णय,जगाची झोप उडाली

कोकणात पावसाच्या सरी

कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाच्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

 

पुणे विभागातही पावसाची शक्यता

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे या भागातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आता ओबीसींचा स्वतंत्र पक्ष ?

नाशिक विभागात ढगाळ वातावरणासह पाऊस

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

 

मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पाऊस, तर काही ठिकाणी कोरडे हवामान

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

आदित्य ठाकरेंची दिशा सालियन प्रकरणावर 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया

विदर्भातील ११ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट नाही

अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत पावसाचा कोणताही अलर्ट नसून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

 

तसेच नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सहाही जिल्ह्यांतही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

BREAKING NEWS;42 रेल्वेगाड्या रद्द, 25 गाड्यांचा मार्ग बदलला ; पाहा संपूर्ण यादी
एकीकडे कोकण, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाच्या सरींची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भातील बहुतांश भागांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

Related Articles