राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले
Rahul Gandhi, accompanied by Members of Parliament, marched straight to PM Modi's residence.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन पुकारलं आहे. सीजेपीनं काल जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित केला होता.
या मोर्चावर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. दिल्लीतील कालच्या लाठीचार्ज प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती.
आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबेहर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी जंतरमंतर जाण्यापूर्वी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.
विशेष बाब म्हणजे या धरणे आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार देखील सहभागी झाले आहेत. यावेळी काँग्रेस खासदारांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेग यांनी देखील घोषणाबाजी केली. मोदींची हुकुमशाही चालणार नाही, मोदी हाय हाय, अमित शाह हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आली.
काँग्रेस खासदारांनी यावेळी धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचं दमन बंद करावं, विद्यार्थ्यांना मारहाण बंद करावी,
अशी घोषणा बाजी काँग्रेस खासदारांनी केली. जेव्हा जेव्हा मोदी घाबरतात त्यावेळी पोलिसांना पुढं करतात, अशा प्रकारच्या घोषणा देखील काँग्रेस नेत्यांनी दिल्या. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आज सकाळी संसद परिसरातून विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारासंदर्भात भूमिका मांडली. विद्यार्थ्यांचा भविष्याचा मुद्दा आहे.
आम्ही लोकसभा अध्यक्षांना चर्चेची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना चर्चेसाठी सरकारची परवानगी लागते म्हणजे काय ते ओळखा. मुलांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. काल जे काही घडलं त्यावर मोदींनी अद्यापही माफी मागितलेली नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.









