VIDEO;पोलिसांनी थेट तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं

VIDEO;The police physically picked up and threw away the three-term MLA.

 

 

 

दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चांगलंच पेटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरमी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत युवकांनी संसदेवर धडक मोर्चा काढला.

 

या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हवामान विभागाने दिली पावसाची तारीख

मोर्चामध्ये सहभागी झालेले आम आदमी पक्षाचे तीन वेळेचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना पोलिसांनी उचलून थेट बॅरिकेट्सवर फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

हा मोर्चा संसदेकडे जाऊ नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी मजबूत बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. मात्र, आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी हे बॅरिकेट्स पार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अखिलेषश त्रिपाटी या आंदोलनात सहभागी होते.

 

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार ;कोणाला मिळणार डच्चू
आंदोलन तीव्र होत असताना आम आदमी पक्षाचे माजी आमदार अखिलेश त्रिपाठी बॅरिकेट्स पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना थेट उचलून बॅरिकेट्सवर फेकून दिले.

 

यामध्ये अखिलेश त्रिपाठी अत्यंत वाईट पद्धतीने खाली आदळल्याचं स्पष्ट दिसत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी

तीन वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीवर दिल्ली पोलिसांनी जनावरांसारखा अत्याचार केला आहे, असा घणाघाती आरोप संजय सिंह यांनी केला. या प्रकारामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.

 

या आंदोलनादरम्यान केवळ माजी आमदारांवरच नव्हे, तर आप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही पोलिसांकडून बळजबरी करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

शरद पवार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही या मोर्चामध्ये पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

Related Articles