मंत्रिमंडळ बैठक 26/05/2026

Cabinet Meeting – May 26, 2026

 

विधान परिषद निवडणुकीत शिंदें मोठा धमाका करण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोकण रेल्वे, शासकीय कर्मचारी आणि धार्मिक ट्रस्टच्या दृष्टीने अनेक धडाकेबाज आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

 

तसेच, राज्यातील इंधनाचा खप अचानक वाढल्याने सरकार अलर्ट मोडवर आले असून, मुख्यमंत्र्यांनी या विक्रमी खपाची आणि साठेबाजीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे:
> सावंतवाडी स्थानकाचे नामकरण ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’

कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. कोकणातील जनतेची ही अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर मार्गी लागली असून, नामकरणाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन अधिनियम २००५ मधील सुधारणेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
> डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराला नाममात्र दरात जमीन

 

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा निर्णय झाला आहे. या जमिनीवरील मंदिराचा सध्याचा वापर नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली.

बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ;4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल

 

नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी मौजे गोदणी व लाडगाव (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन थेट खरेदी केली जाणार आहे. या जमिनीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

 

 

Related Articles