भोंदू अशोक खरातच्या टार्गेटवर थेट शरद पवार? दाव्याने राज्यात खळबळ

Is the charlatan Ashok Kharat directly targeting Sharad Pawar? The claim sparks a sensation across the state.

 

 

भोंदूबाबा अशोक खरातने काळी जादू, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या कुकृत्याचे काही व्हिडीओही बाहेर आले आहेत.

भोंदू खरातच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत एकनाथ शिंदेंसह तीन बड्या मंत्र्यांसह बडे राजकारणी प्रमुख पाहुणे

सध्या अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर आता त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचीही अनेक प्रकरणे समोर येत आहेत. खरातचे प्रकरण बाहेर आल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मंत्रिपदासाठी खरातची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा केला होता.

 

त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी केलेल्या आणखी एका दाव्याने राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी थेट शरद पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

22 राज्यांना पावसाचा अलर्ट

.
अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुल्या मारल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच अजितदादा यांच्यासोबतच आणखी एका नेत्याच्या फोटोवर त्याने फुल्या मारल्या होत्या,

 

असेही त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना तृप्ती देसाई यांनी थेट खासदार शरद पवार यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली. अजितदादा पवार यांच्या फोटोवर काळ्या फुल्या केल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर शिंदे गटाच्या ‘डिनर’ला

आता अजित पवार हयात नाहीत. यात कोणी काही चुकीचं केलं असेल तर संबंधीताला शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

 

तसेच, अजितदादा कधीच अंधश्रद्धेला बळी पडले नाहीत. ते अशा गोष्टींना मानत नव्हते. अशोक खरातने महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळ बैठक ;6 निर्णय

मला वाटतंय की ते शरद पवार यांचे नाव असू शकते. कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न होते, असे म्हणत त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली.

 

पुढे बोलताना, काही जणांना अजित पवार, शरद पवार यांच्यापेक्षाही मोठे व्हायचे होते. अशा पद्धतीने खरातच्या माध्यमातून काळी जादू, अघोरी पूजा करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे,

मंत्रिमंडळ बैठक ;6 निर्णय

अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली. दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या या दाव्यानंतर आता नेमकं काय होणार? त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरु राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

 

अंजली दमानियांच्या आरोपांनुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

 

दमानिया यांच्या आरोपावर मंत्री उदय यामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचं फोनवर बोलणं झालंय, त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणं झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केलं आहे.

 

मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे असे सामंत म्हणाले. आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात. मग त्याने काही चुकीचं कृत्य केलं तर त्यात आम्ही सामील आहोत का? असा सवाल सामंत यांनी केला,

 

एमएनजीएल कडून हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवण्यास दिरंगाई होत आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. एमएनजीएल गॅसचा पुरवठा जाणीवपूर्वक केला जात नसेल तर कडक कारवाई करु असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

 

उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र जाणीवपूर्वक आर्टिफिशियल तुटवडा निर्माण होत असेल तर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल असे सामंत म्हणाले.

 

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना दैनंदिन वापरासाठी 100 टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तर व्यवसायिक वापरासाठी 80 टक्के पुरवठा करण्याचे निर्देशित केले आहे.

 

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. अशात भारतावर देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. एलपीजी गॅस पुरवठ्यात घट झाल्यानंतर आता पाईपलाईन गॅसमध्येही कपात झाल्यानं हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, मेस तसेच इतर व्यावसायिक यांना दुहेरी फटका बसत आहे.

 

त्यामुळं व्यावसायिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. गॅस अभावी व्यवसायावर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने गॅस वितरकांना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांनाच प्राधान्य देण्याची निर्देश दिलेत.

 

सरकारच्या निर्णयामुळं घरगुती गॅस आणि सीएनजी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं सामान्य घरगुती ग्राहकांवर सध्या परिणाम जाणवत नसला तरी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात कपातीमुळं हॉटेल आणि केटरिंग, रेस्टॉरंट व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

 

 

Related Articles