एनडीए आधाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष फुटणार? ; राजकारणात खळबळ!

Is the second-largest party in the NDA alliance set to split? A stir in political circles!

 

 

देशाच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून चांगलीच उलथापालथ सुरू आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांचे विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली आहे.

नीट पेपरफुटी 47 अधिकाऱ्यांना केले बडतर्फ

तर, दुसरीकडे सरकारविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. अशातच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सगळं काही आलबेलं असल्याची चिन्ह नाहीत.

 

एनडीएतील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षात तीन खासदारांनी एनडीएच्या बैठकीकडे पाठ फिरवली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

 

एनडीए आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या (NCPI) तीन खासदारांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA)

नीट पेपरफुटी 47 अधिकाऱ्यांना केले बडतर्फ

महत्त्वाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. माजी तृणमूल काँग्रेस (TMC) सदस्य असलेल्या या तीनही खासदारांनी भाजप किंवा एनडीएमध्ये प्रवेश करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

 

गेल्या काही दिवसांत हे तीन खासदार अबू ताहेर खान (मूर्शिदाबाद), खलीलुर रहमान (जंगीपूर) आणि युसूफ पठाण एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहण्याची ही दुसरी वेळ आहे.

MPSC चा टॉपर पण अडकला लाचेच्या जाळ्यात

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत संसदेत ही बैठक पार पडली.

 

संसद भवनात पत्रकारांशी बोलताना मूर्शिदाबादचे खासदार अबू ताहेर खान म्हणाले, “आम्ही एनडीएचा भाग असणार नाही आणि कधीही भाजपसोबत अथवा त्यांच्या आघाडीमध्ये प्रवेश करणार नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे.

 

आमच्या मतदारसंघातील विकासकामांवर याचा परिणाम होत असला, तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही एनडीए किंवा भाजपसोबत जाणार नाही, याची सर्वांनी खात्री बाळगावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंची टीका, म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे

एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या या तीन खासदारांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या एका समन्वय बैठकीला मात्र हजेरी लावली.

 

या बैठकीत NCPI च्या १९ खासदारांसह नुकतेच भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झालेल्या तीन खासदारांचा समावेश होता. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांचीही उपस्थिती होती.

.अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

या ३ खासदारांच्या भूमिकेवर बोलताना तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय म्हणाले की, मूर्शिदाबादच्या या खासदारांची विचारसरणी आणि राजकारण हे नैसर्गिकरित्या भाजप किंवा एनडीएशी सुसंगत नाही.

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर २८ बंडखोर लोकसभा खासदारांपैकी २० खासदारांनी १४ जून रोजी NCPI मध्ये प्रवेश केला होता. मात्र, अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण यांनी पक्षाच्या या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.

 

आता सीजेपीच्या मागे लागली ईडी…पडद्यामागे मोठ्या हालचाली!

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

 

त्या म्हणाल्या, “पोलीस, ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) दबावामुळे खासदार आणि आमदारांना पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

पोलीस ठाण्यांचे प्रभारी गाड्या घेऊन जातात आणि ‘भाजपमध्ये या, नाहीतर अटक करू’ अशी धमकी देत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

 

 

Related Articles