MPSC चा टॉपर पण अडकला लाचेच्या जाळ्यात
Even MPSC topper caught in bribery trap

चक्क 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या श्रीनिवास लखमावाड या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असतानाच घडलेल्या या धाडसी लाचखोरीने संपूर्ण प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका
पालकमंत्र्यांची बैठक आटोपून घरी गेल्यानंतर घरात लाचेची रक्कम स्वीकारताना हा लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे, हे महाशय 2016 च्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात राज्यात एसटी प्रवर्गात पहिले आले होते.
वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलन
या संदर्भात एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला.
यावेळी 5 लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित 40 लाखांच्या मनोरंजनाच्या (खोट्या) नोटा स्वीकारताना लखमावाड याला रंगेहात पकडण्यात आले.
राजकारणात समीकरण बदलणार? CM फडणवीस, एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना
छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, या कारवाईनंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे स्वतः बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.
याप्रकरणी बीडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एसीबीचे अधिकारी करत आहेत.
विशेष म्हणजे श्रीनिवास लखमावाड हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जमातीमधून प्रथम येऊन शासकीय सेवेत रुजू झाला होता. 2016 साली MPSC मध्ये ST प्रवर्गामधून तो राज्यात प्रथम आला होता.
श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेते ते राज्यातून अनुसूचित जमातीतून प्रथम आले आहेत.
नीट पेपरफुटी 47 अधिकाऱ्यांना केले बडतर्फ
सन 2016 साली एमपीएससी स्पर्धेत प्रथम आलेल्या श्रीनिवास यांना आज 45 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय.
दहावीपर्यंत नांदडमध्ये शिकल्यानंतर पुढे ते बी.टेक. इंजिनिअर बनले. स्वतःवर विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही अडचणीवर मात करता येते, असे त्यांनी एमपीएससीतून निवड झाल्यानंतर म्हटले होते.









