.अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
Congress workers arrested during Amit Shah's Maharashtra tour

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने शनिवारी पुण्यात दाखल झाले आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या अमित शाह यांना काँग्रेसकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंची टीका, म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी म्हणजे काल रात्रीपासूनच जोरदार कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांनी युवक काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पकडण्याचा सपाटा लावला आहे.
काँग्रेस कार्यकर्ता राहुल शिरसाट याला पोलिसांनी काहीवेळापूर्वीच घरातून ताब्यात घेतले. पुण्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात येतंय.
राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले
पुण्यातील येरवडा भागातून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख, राजू ठोंबरे या युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले
आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पूर्व खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते.
VIDEO;पोलिसांनी थेट तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं
त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडूनही पुण्यात निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, या सगळ्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही पुण्यातील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर जमले आहेत. त्यामुळे पुण्यात आज भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ना सुनावणी, ना वकील ट्रम्प करणार पुन्हा १८ हजार भारतीयांची हकालपट्टी
काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील उत्सव हॉटेल चौकात आज सकाळपासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि याच सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच कटारिया महाविद्यालयात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा;अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच
प्रवेशद्वारावर सगळ्यांच्या तपासण्या केल्या जात आहे आणि सोबतच कार्यक्रमात स्थळी देखील डॉग स्कॉड कडून तपासणी केली जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला









