परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

Bordikar appointed Chairman, Goregaonkar Vice-Chairman of Parbhani District Central Bank.

 

 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रीया सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी पार पडली. यात भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली.

 

अध्यक्षपदासाठी केवळ बोर्डीकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी गोरेगावकर व आ. सईद खान यांनी अर्ज दाखल केला होता. परंतू शेवटच्या क्षणी आ. खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

MPSC चा टॉपर पण अडकला लाचेच्या जाळ्यात

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण प्रक्रियेकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

संचालक पदची निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड राहीली होती. या दोन पदांच्या निवडीकरीता आज सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही पदाकरीता निवडणूक निर्णय अधिका-यांनी उमेदवारी अर्ज मागवले होते.

राज ठाकरेंची टीका, म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे

त्यात अध्यक्ष पदाकरिता ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. उपाध्यक्ष पदाकरीता राजेश पाटील गोरेगावकर व आमदार सईद खान या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

 

या अर्जांची छाननी प्रक्रिया लगेच पार पडली. या प्रक्रियेत अध्यक्ष पदाकरीता बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरला तर उपाध्यक्ष पदाकरीता दाखल झालेल्या दोघांचेही अर्ज वैध ठरले.

 

त्यानंतर अध्यक्ष पदाकरीता बोर्डीकर यांची निवड निश्चित झाली. उपाध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लख लागले होते.

.अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

दरम्यान आमदार सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज अंतिम क्षणी मागे घेतला. त्यामुळे गोरेगावकर यांच्या उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

 

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांची नावे जाहीर करताच कार्यकर्त्यांसह समर्थकांनी बँक परिसरात गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला.

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते व समर्थकांनी सकाळ पासून मोठी गर्दी केली होती. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी

आता सीजेपीच्या मागे लागली ईडी…पडद्यामागे मोठ्या हालचाली!

छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात फटाके फोडू गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. बँकेच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते बोर्डीकर यांची निवड होताच

 

त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळाले. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत बँकेचा परिसर दणाणून सोडला होता.

 

Related Articles