हिंगोली जिल्ह्यात अभिजित दीपिकेच्या समोर विद्यार्थी शाळेत झाडू मारु लागले;काय म्हणाले? शिक्षक
In Hingoli district, students began sweeping the school in front of Abhijit Dipike; here is what the teacher said.

कॉकरोच जनता पार्टीच संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी ‘स्कूल ठीक करो’ अभियानातंर्गत हिंगोलीच्या ढेगस गावातील सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अभिजीत दिपके चांगलेच संतापले.
थेट आमदाराच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी,
अभिजीत दिपके शाळेची पाहणी करत असताना एका वर्गात लहान विद्यार्थी झाडू मारत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे अभिजीत दिपके यांचा पारा चांगलाच चढला.
त्यांनी लहान मुलांना विचारले की, ‘तुम्हाला वर्गात झाडू मारायला कोण सांगतं?’ त्यावर शिक्षकांनी विद्यार्थी स्वत:च्याच मनाने करतात, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
काॅकरोच’ वक्तव्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा एकदा खुलासा
त्यावर अभिजीत दिपके आणखी संतापले. विद्यार्थी त्यांच्या मनाने झाडू मारत नाहीत. हे चुकीचं आहे. ती लहान मुले आहेत. ती शाळेत शिकण्यासाठी येतात. तुम्ही त्यांच्याकडून झाडू मारुन घेणार का, असा सवाल अभिजीत दिपके यांनी शिक्षकांना विचारला.
यानंतर अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांनाही झाडू न मारण्याविषयी बजावले. याच्यानंतर कोणी झाडू मारायचा नाही शाळेत, तुम्ही फक्त शिकायला यायचं शाळेत.
साफसफाई करायची नाही. पुन्हा असं घडलं तर मला फोन करा, असे अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर दिपके यांनी मुलांना शाळेत काय-काय हवं असे विचारले. यावर मुलांनी बाथरुम, वह्या-पुस्तकं, पेन, कपडे, फळा, बुटं, दार, अशा मागण्यांचा पाढा वाचला.
राष्ट्रवादी कडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी जबाबदारी
हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिली होती, या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेमध्ये दारू पिऊन राहतो असं निदर्शनास आलं होतं,
संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके हा शाळेतच दारू पीत असल्याचे व्हिडिओ अभिजीत दिपके यांनी समोर आणले होते आणि या शिक्षकावर कारवाई करा, अन्यथा मंगळवारी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिपके यांनी दिला होता.
सुप्रिया सुळे म्हणजे लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी
अखेर अभिजीत दिपके हिंगोली जिल्ह्यांमध्ये दाखल होण्यापूर्वीच काल संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याला निलंबित करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले.
तसेच या शाळेला नवे चार शिक्षक द्या, अशी मागणीही अभिजीत दिपके यांनी केली होती. याबाबत दिपके यांचे फोनवर शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी लेटरहेडवर लिहून देतो, असं आश्वासन दिलं होतं.








