थेट आमदाराच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी,
MLA's son directly threatens Shiv Sena Taluka Chief with death.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा मुलगा वामन हिरामण खोसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. खोसकर याच्या मुलाने त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुखाला
जरांगे पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहरी टीका
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या कथित व्हायरल क्लिपमधून स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर जीवे मारण्याचा गंभीर आरोप होत आहे. या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पेटली आहे.
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. यात ते शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांना शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे.
शिवसेना कोणाची , कपिल सिब्बल यांचे 19 युक्तिवाद; आज सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?
या प्रकरणात त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी पोलिसांत वामन खोसकर यांच्या विरोधात थेट तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणामुळे अजितदादांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातच कलगीतुरा लागल्याचे स्पष्ट होत आहे.
ही क्लिप सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. या क्लिपला टीव्ही ९ मराठी चॅनलने दुजोरा दिलेला नाही. या संदर्भात स्वत: रविंद्र भोये यांनीच पोलिसांकडे तक्रार केली आहे.
गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना कुंभमेळा घोटाळा प्रकरणात अटक
रविंद्र भोये यांनी या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली आहे. वामन हिरामण खोसकर यांनी आपल्या शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रविंद्र भोये यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्यानेच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा रविंद्र भोये यांनी केला आहे.







