सावजी मटण मुळे तुकाराम मुंडे अडचणीत
Tukaram Mundhe in trouble over Savji mutton.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर
सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं विधान अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं होतं. या विधानामुळे मुंढे अडचणीत सापडले आहेत.
त्यांच्या या विधानावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सावजी मटण ही केवळ पाककृती नाहीये, तर ती वैदर्भीय खाद्य संस्कृती आहे, असं म्हणत वैदर्भीयांनी मुंढे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुंढे यांच्या या विधानाच्या विरोधात हलबा समाज रस्त्यावर उतरला असून त्यांनी मुंढे यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.
खरी शिवसेना कोणाची आज सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?निकाल लवकरच
तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत आल्यावर नागपुरी सावजी विषयी विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सावजी (हलबा) समाजाने निषेध नोंदवला आहे. हलबा समाजाने आज रस्त्यावर उतरून तुकाराम मुंढे यांचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, नागपुरी सावजीबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी त्यावर आज पुन्हा प्रतिक्रिया व्यकत् केली होती. आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी अमरावती येथील कार्यक्रमात हे विधान केलं होतं.
राज ठाकरेंची टीका, म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे
सावजी खाल्लं तर मी आजारी पडेन असं म्हटलं होतं. हे खरं आहे. पण, इतर कोणी खा किंवा खाऊ नका, असं मी म्हटलेलं नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. यावेळी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच सावजी खाल्ल्याचा किस्साही सांगितला.
एकदा माझ्या मित्राने मला जबरदस्ती सावजी खायला नेलं होतं. त्यावेळी त्याचा रंग आणि तेल मी पाहिलं. केवळ एकच घास खाल्ला आणि उठलो. त्यामुळे मी फक्त माझ्या बाबत वक्तव्य केलं होतं. माफी मागायचा काही प्रश्नच नाही, असंही त्यांनी सांगितलं.
.अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
दरम्यान, तुकाराम मुंढे यांचं हे विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्याबाबतचे मिम्सही व्हायरल होत आहेत.
तसेच तुकाराम मुंढे यांच्या या व्हिडिओवर अनेक पोस्ट येत आहेत. काही पोस्टमध्ये तर चला सावजी खाऊ असं म्हटलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सावजी मटण हा ट्रेंड सुरू झाला आहे.








