विधान परिषद निवडणुकीत शिंदें मोठा धमाका करण्याच्या तयारीत
Shinde Prepares to Create a Major Sensation in the Legislative Council Elections!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे विधानपरिषद जागेवरून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठे ‘धक्कातंत्र’ वापरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अमेरिकेत उडाली खळबळ, इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी
जागावाटपात ही जागा शिवसेना (शिंदे गट) आपल्याकडेच ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटाच्या दाव्याला भाजपच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याच्या तयारी आहेत.
ठाणे-पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘न्यूज १८ मराठी’ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा शिंदेसेना लढवणार
या निवडणुकीत मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेने एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाला विलीन केल्यानंतर आता आणखी एक डाव टाकला जाणार आहे.
वसई-विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांची मोठी ताकद आहे. पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यातही त्यांच्या पक्षाचे काम आहे. आता, हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला (बविआ) शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसई-विरार पट्ट्यात बविआची असलेली ताकद लक्षात घेता,
पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ
हा निर्णय महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो. विलीनीकरण झाल्यास राज्यातील राजकीय समीकरणार मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. बहुजन विकास आघाडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ले समजला जाणाऱ्या वसई आणि नालासोपारा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला होता. या दोन्ही ठिकाणी भाजप विजयी झाली.
या नवीन राजकीय समीकरणामुळे शिवसेनेचे विद्यमान नेते रवींद्र फाटक यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यासाठी फाटक यांनी नुकतीच महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती, मात्र या नव्या खेळीमुळे त्यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या जागी ‘बविआ’चे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची शिवसेनेचे उमेदवार म्हणून अनपेक्षित एंट्री होऊ शकते.
पीएम किसान योजनेत सरकारचे नवे बदल
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने हा डाव टाकल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य घडामोडींमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.









