पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ

Petrol and diesel prices hiked for the fourth time in 10 days.

 

 

सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना त्यात पुन्हा काहीशी भर घालणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे.

परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा शिंदेसेना लढवणार

गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ  झाली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी

दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे.

 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली.

डॉ.धोंडोपंत मानवतकर दि. १८ रोजी आकाशवाणीवर

त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने महाग झाले आहे.

 

Related Articles