पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी

Suvendu Adhikari as Chief Minister of West Bengal

 

 

पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

 

जवळपास आठ प्रस्ताव मिळाले, त्यात एकच नाव होतं. दुसऱ्या नावासाठी योग्य वेळ देण्यात आलं मात्र दुसरं नाव आलं नाही . यामुळं केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगाल विधानमंडळाचे नेते म्हणून जाहीर करत असल्याचं अमित शाह यांनी जाहीर केलं.

थेट कलेक्टरलाच अटक,मराठवाड्यात खळबळ ;काय आहे प्रकरण

भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 207 जागांवर विजय मिळवला. यानंतर भाजपकडून शुभेंदू अधिकारी यांची विधानमंडळ पक्षाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली.

 

पश्चिम बंगालमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपच्या विधिमंडळ नेते म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली.

५० हजाराची लाच घेताना महिला मंडळ अधिकारीला अटक

यानंतर भाजपच्या आमदारांनी जल्लोष केला. अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी आजचे सत्कारमूर्ती असल्याचं म्हटलं. आज भाजपचं एवढं मोठा विधिमंडळ पक्ष पाहून आनंद होतोय, असं अमित शाह म्हणाले. सर्व नवनिर्वाचित आमदारांना नमस्कार असं अमित शाह यांनी म्हटलं.

 

अमित शाह यांनी दोन्ही हात जोडून पश्चिम बंगालच्या जनतेला कोटी कोटी प्रणाम करतो, असं म्हटलं. कम्युनिस्टांच्या काळात असलेल्या वातावरणाला ममता बॅनर्जी यांनी त्याचं रुपांतर भयात केलं,

भाजपचे बंगालमधील विजयाच्या धांदलीचे प्रकरण डोनाल्ड ट्रम्पच्या दारी

असं अमित शाह म्हणाले. या दरम्यान भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर बंगालच्या जनतेनं मोठा विजय दिला याबद्दल आभार मानतो, असं अमित शाह म्हणाले. तुमचा विश्वासाला कणभर ठेच पोहोचणार नाही याची दक्षता घेणार असं अमित शाह म्हणाले.

 

आम्ही सोनार बांगलाच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत, असंही शाह म्हणाले. लोकशाहीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं आणि बंगालच्या दृष्टीनं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या जनतेला आश्वासन दिलंय ते पूर्ण करण्यासाठी आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करा.

सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार,जय पवरांच्या वक्तव्याने भाजपात खळबळ

बंगालची संस्कृती आणि बंगालच्या परंपरेला पाच दशकांपासून विदेशी विचारांपासून प्रभावित राज्याला दूर करुन रामकृष्ण ठाकूर, महर्षी अरविंद, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचाराचा बंगाल निर्माण करण्याच्या दिशेनं पुढं जाणार आहोत, असं अमित शाह म्हणाले.

 

आज बंगालचा विजय अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. 100 वर्षांच्या वैचारिक प्रवासानंतर गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपचं सरकार बनलं आहे,

पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत म्हणाले,दिवा विझताना अधिक फडफडतो

हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 1950 पासून विचार घेऊन श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्त्वात निघालो. 1950 नंतर 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचाराचं सरकार आलं आहे, असं अमित शाह म्हणाले.

 

 

Related Articles