सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
After the rebellion by six MPs, there is now talk of a seventh; a senior leader from the Shinde camp makes a sensational claim.


शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली राजकीय खळबळ अद्याप थांबलेली नसतानाच आता आणखी एका दाव्याने चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू रामदास कदम यांनी ठाकरे गटातील आणखी एक खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे सहा खासदारांवरील चर्चा सुरू असतानाच ‘सातवा खासदार कोण?’ हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदमांनी ठाकरे गटाचा सातवा खासदारही नाराज असल्याचा दावा केला. संबंधित खासदार मंत्रिपदासाठी आग्रही होता,
विलीनीकरण लांबले?,तांत्रिक बाबीं पूर्ण करणार
असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आधीच पक्षांतर्गत घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या ठाकरे गटाला आजच म्हणजे शिवसेना वर्धापनदिनीच हा धक्का मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.
गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला मोजकेच खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती.
जयपूरहून बंडखोर 6 खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार
त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा खासदारांची बैठक घेण्यात आली. पक्षाने व्हीपही जारी केला होता. तरीही सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने पक्षातील नाराजी उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगली.
बंड केलेले सहा खासदार आज रोजी म्हणजे वर्धापन दिनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पुढील काही तासांत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी मुहूर्त ठरला
रामदास कदम यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे मुंबईतील २५ नगरसेवक संपर्कात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आगामी काळात ठाकरे गटातील आणखी नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात येतील, असे संकेतही त्यांनी दिले.
बंडखोर खासदार 6 संजय जाधव यांना मोठी लॉटरी लागणार ,पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा ?
आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून या घडामोडींवर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहा खासदारांच्या बंडानंतर पक्षाची पुढील रणनीती काय असेल, कथित सातव्या खासदाराबाबत काही भाष्य होणार का आणि शिंदे गटाकडून होत असलेल्या दाव्यांना ठाकरे कसे उत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.








