राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Monsoon active in the state; heavy rain expected, 'Yellow Alert' for these 15 districts.

 

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अद्यापही काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असताना दिसून येतो. अशातच कोकण विभागात 1, पश्चिम महाराष्ट्र 2, मराठवाडा 2 आणि विदर्भातील 10 अशा एकूण 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच 11 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये TMC चे विलीनीकरण ?

कोकण
कोकण विभागात पालघर जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दिवसभर उष्णता राहणार असून सायंकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

 

अशातच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणाले ;अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा.

पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज देण्यात आला. याच भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

मराठवाडा
मराठवाडा विभागातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. याच भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

ओमानजवळ भारतीय जहाजावर मोठा हल्ला

तर दुसरीकडे  संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

विदर्भ
विदर्भ विभागाच पावसाची अधिक तीव्रता राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे.

 

 

Related Articles